मावळ ऑनलाईन –जीवनाची खरी सुंदरता बाहेर नाही, ती स्वतःमध्ये शोधावी लागते. (Vadgaon Maval)मन प्रसन्न व चित्त स्थिर ठेवून गुण अधिक उजळवणे आणि उणिवा कमी करण्याचा प्रयत्न केला, तर यश-अपयश दोघांचेही स्वागत सहज करता येते. प्रत्येकाचा दृष्टिकोनच त्याच्या आयुष्याला आपली वेगळी ओळख देतो,असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर बोलताना केले. मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे आठवे पुष्प गुंफताना अभिनेत्री वाड बोलत होत्या.
यावळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ माजी अध्यक्ष उल्हास दादा पवार,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण बराटे,उद्योजक दिलीप सोनिगरा,मावळ विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर,कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य,यावर्षीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर,कार्याध्यक्ष अजित देशपांडे,उपाध्यक्ष ॲड दामोदर भंडारी,सचिव गिरीश गुजराणी, कार्यक्रम प्रमुख धनश्री भोंडवे, आरती राऊत,खजिनदार संतोष भालेराव,प्रसिद्धीप्रमुख अतुल म्हाळसकर आदी उपस्थित होते.
Talegaon Dabhade:”शिवचरित्र पारायण सोहळा नवरात्री उत्सवामध्ये यशस्वीरित्या संपन्न…”
Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९७ लाख ५० हजारांची फसवणूक
निशिगंधा वाड पुढे बोलताना म्हणाल्या की, स्पर्धा ही इतर दुसऱ्यांबरोबर नसून ती स्वतःशी करावी. स्पर्धेचे स्वरूप आपण अंतर्मुख करायला हवे आपल्यातील चांगल्या गुणांना अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा, ज्या उणीवा आहेत त्यांची वजाबाकी न करता त्या सुधारण्याचा प्रयत्न केल्यास जगण्याला सुंदरता प्राप्त होईल असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन श्रेया भंडारी यांनी केले. तर सन्मान पत्राचे वाचन दीपक भालेराव व आभार रोहिणी भोरे यांनी मानले.