अजित पवार यांच्या संकल्पनेतून व आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून मावळच्या शैक्षणिक विकासाला नवीन सुरवात
मावळ ऑनलाईन – मावळमध्ये शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक ( Pune Model School) बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने मौजे भोयरे येथे “पुणे मॉडेल स्कूल – आदर्श शाळा” उभारणीचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेला आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नातून मूर्त रूप दिले. भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम ऐतिहासिक ठरणार आहे.
Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९७ लाख ५० हजारांची फसवणूक
या शैक्षणिक विकासकामांत जि.प. प्राथमिक शाळेत नवीन ( Pune Model School) वर्गखोली बांधकाम, शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व भौतिक सुधारणा यांचा समावेश आहे. या कामांसाठी एकूण निधी ₹१ कोटी ५९ लाख इतका राखण्यात आला असून हा उपक्रम मावळच्या विद्यार्थ्यांसाठी नवी संधी आणि उज्ज्वल भविष्याची खात्री देणार आहे.

ग्रामस्थांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले असून त्यांनी ( Pune Model School) म्हटले की, “मावळात शाळांना आधुनिक रुप देणे आणि मुलांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली वास्तविकतेत उतरले आहे. मुलांच्या भविष्यासाठी हा पाऊल ऐतिहासिक ठरेल.”
Maval Crime News : चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न
सुनील शेळके यांनी ग्रामविकास, पाणी, रस्ते, शेतीसह शिक्षणालाही ( Pune Model School) प्राधान्य देत मावळच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस पायाभरणी केली आहे. हा उपक्रम मावळच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मीलाचा दगड ठरवणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला नारायण ठाकर, नारायण मालपोटे, भिकाची भागवत, अमोल भोईरकर, बळीराम भोईरकर, सोमनाथ जाधव, बाबुराव आडीवळे, रोशन पिंगळे, भारत अडिवळे, मंगेश आडीवळे, गोरख भोईरकर, पांडुरंग भोईरकर, नाथा भोईरकर, गायकवाड मुख्याध्यापक, नवनाथ भोईरकर, भाऊ बोऱ्हाडे, भास्कर पिंजळ, वैभव पिंगळे, रामभाऊ भोईरकर, राजू करवंदे, योगेश लंके, बाळासाहेब भोईरकर, तानाजी भोईरकर, सुरज भोईरकर, वसंत आडीवळे, बाळू आडीवळे ( Pune Model School) उपस्थित होते.