मावळ ऑनलाईन – जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका ( Maval Crime News) तरुणाला चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (२९ सप्टेंबर) दुपारी मावळ येथील वरोळे येथे घडली.
Pune Srujansabha : शिवछत्रपतींचे दुर्ग म्हणजे जिवंत शिवशाहीर – मोहन शेटे
ओंकेश लक्ष्मण मंडलपवाड (२१, वराळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुद्र कांबळे (वराळे), पियुष कुमार (वराळे), प्रतिक ताथळे (तळेगाव दाभाडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Maval Crime News) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला पकडून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने डोक्यात वार केला. फिर्यादीने तो वार चुकवल्याने तो डाव्या गालावर बसला आणि त्यांना दुखापत झाली. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत ( Maval Crime News) आहेत.