मावळ ऑनलाईन – सुसंस्कारित विद्यार्थी आणि आदर्श समाज ( Talegaon Dabhade News ) घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात त्यांचे समाजातील आजही स्थान टिकून आहे. शालेय जीवनात पुस्तकी ज्ञानासोबतच खेळालाही तेवढेच महत्व दिले पाहिजे. विद्यार्थ्यांचे तंदुरुस्त शरीर आणि सक्षम मन घडविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळ व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून भेगडे हे बोलत ( Talegaon Dabhade News ) होते.


यावेळी सहकार भूषण,पुणे पीपल्स को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक बबनराव भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या दोन्ही संस्था राबवीत असलेल्या स्तुत्य उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
Shilpa Rodge : शिल्पा रोडगे मावळच्या गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्त
कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व पुणे महानगर नियोजन समितीचे ( Talegaon Dabhade News ) सदस्य संतोष भेगडे,नगरसेवक अरुण माने,वडगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे,जिल्हाध्यक्ष निलेश काशिद, कार्यवाह महेश शेलार, संघटनमंत्री रामदास अभंग,डोळसनाथ सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित भसे,राजेंद्र भांड,धनकुमार शिंदे, जिल्हा प्रतिनिधी भाऊसाहेब आगळमे,शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष राम कदमबांडे कार्यवाह देवराम पारीठे, कार्याध्यक्ष अशोक कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Ayush Komkar Murder Case : आयुष कोमकर खून प्रकरणी बंडू आंदेकरसह १२ आरोपी येरवडा कारागृहात
पुढे बोलताना बाळा भेगडे म्हणाले की,शिक्षक आपल्या ज्ञानाने अनुभवाने आणि मार्गदर्शनाने नव्या पिढीला घडवतो संस्कार देतो आणि त्यांच्या स्वप्नांना गती ( Talegaon Dabhade News ) देतो.
यावेळी बोलताना संतोष भेगडे म्हणाले की,शिक्षक पुरस्कार हा केवळ सन्मान नाही तर शिक्षकांच्या अथक परिश्रमाचा, निष्ठेचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव आहे.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला काळे निलेश काशिद,महेश शेलार, गुलाबराव गवळे यांची मनोगते व्यक्त केली.
यावेळी शिक्षकांच्या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून पवना शिक्षण संकुलाचे ( Talegaon Dabhade News ) प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार तसेच गुलाबराव गवळे यांनी विशेष कार्यगौराव सन्मानाने सन्मानित करण्यात आले मावळ तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाला नवा सन्मान मिळाला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष राम कदमबांडे यांनी केले. सूत्रसंचालन भारत काळे,वैशाली कोयते यांनी केले तर आभार समीर भेगडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सर्व शिक्षकांनी ( Talegaon Dabhade News ) विशेष परिश्रम घेतले.