मावळ ऑनलाईन – लोणावळ्यात पावसाची (Lonavala Rain News) संततधार अजूनही थांबलेली नाही. शनिवार आणि रविवारीही जोरदार पाऊस झाला असून, रविवारी सकाळपर्यंत ८८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांनी त्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Accident : कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळून अपघात; एकजण ठार तर एकजण जखमी
पावसाने मागील वर्षाची सरासरी ओलांडली (Lonavala Rain News) असून, २८ सप्टेंबरपर्यंत लोणावळ्यात ५,९७७ मिमी (२३५.३१ इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी त्याच दिवशी ५,८२२ मिमी (२२९.२१ इंच) पावसाची नोंद होती. गेल्या हंगामात लोणावळ्यात एकूण ६,०१० मिमी (२३६.७३ इंच) पाऊस पडला होता.
Rashi Bhavishya 29 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे पावसाच्या संभाव्य संकटासाठी तत्परतेची अपेक्षा व्यक्त केली असून, सुरक्षितता आणि जलनिकासी यावर विशेष लक्ष देण्याची मागणी केली (Lonavala Rain News) आहे.