तांत्रिक, व्यावसायिक आणि व्यवस्थापन कौशल्याला आत्मसात करण्याचे आवाहन
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथे औद्योगिक शिक्षण मंडळाच्या नेक्स्ट-जेन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ( Next-Gen College)पहिल्या बॅचचा ” आरंभ 2025 ” कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. प्रमुख वक्ते म्हणून कॉन्फडेरशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा एआय तज्ज्ञ संशोधक डॉ. श्रीकांत सारडा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए. एस. एम. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे होते.
Accident : कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळून अपघात; एकजण ठार तर एकजण जखमी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त नेक्स्ट-जेन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तळेगाव दाभाडे येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमास संस्था संचालक ( Next-Gen College) प्रीती पाचपांडे, प्रा. डॉ. व्ही. पी. पवार, डॉ. श्याम माथूर, डॉ. राहुल पाटील, डॉ. रूपा प्रवीण, डॉ. ललित कानोरे, डॉ. डॅनियल पेंडकर, डॉ. संदीप साने, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. हंसराज थोरात आणि नेक्स्ट जेन कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. संस्थेतर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Rashi Bhavishya 29 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
उपस्थित पाहुणे, संचालक मंडळ, प्रथम बॅचचे विद्यार्थी ( Next-Gen College) आणि पालकांचे स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे म्हणाले, की औद्योगिक शिक्षण मंडळाच्या गेल्या 40 वर्षांच्या काळातील 72 हजारांवर माजी विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. संस्थेच्या पाच कॅम्पसमधील 15 शाळा, महाविद्यालयात 14 हजारांवर विद्यार्थी सध्या शिकत आहेत.
तळेगाव दाभाडे येथील 14 एकर जागेवरील निसर्गरम्य ठिकाणी( Next-Gen College) नेक्स्ट जेन कॉलेज नवे असले तरी ते एएसएमच्या 40 वर्षांच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेतील पुढचे एक प्रगत पाऊल आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्याने विकसित झालेल्या आयटी विषयातील अनुभवी, अभ्यासू आणि अध्यापनात कार्यकुशल असलेले प्राध्यापक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि अध्यापनासाठी तत्पर आहेत.
नवनिर्मितीचा ध्यास यशासाठी आवश्यक असल्याने येत्या चार वर्षात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच टेक्निकल स्किल, सॉफ्ट स्किल आणि बिझनेस स्किल यात निपुनता ( Next-Gen College) आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्याचे आवाहन डॉ. पाचपांडे यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने खेळ, व्यायाम, संगीत, कला, धाडसी खेळ आदी प्रकारच्या क्लबसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात भाग घ्यावा. विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सक्षमता आणि आध्यात्मिक शक्ती अंगी बाळगत नवनिर्माणासाठी 100 टक्के योगदान दिल्यास यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असा संदेश डॉ. पाचपांडे यांनी यावेळी दिला.
प्रमुख वक्ते डॉ. श्रीकांत सारडा यांनी एआय तंत्रज्ञानाचा इतिहास, वर्तमान ( Next-Gen College)आणि येणाऱ्या काळातील बदल यावर विचार व्यक्त केले. ते म्हणाले, की तंत्रज्ञानातील बदल इतक्या वेगाने होत आहे की आता विद्यार्थ्यांनी लर्निंग पेक्षा अनलर्निंग करत ऍक्टिव्ह, प्रॅक्टिकल लर्निंगने स्वतःला इंजिनिअरिंगच्या विश्वातील माहिती जाणून घेत सतत अपडेट व्हावे लागेल.
कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून अन कम्फर्टेबल वाटणाऱ्या आव्हानांना सामोरे गेले पाहिजे. जगातील राजकारण, समाजकारण, औद्योगिक घडामोडी आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील घटना घडामोडींची माहिती घेऊन त्याचे नेमके विश्लेषण केले पाहिजे.
यासर्वांचा जनरेटिव्ह इम्पॅक्ट पाहता यशाला सातत्याने टिकविण्यासाठी आवश्यक असलेले स्किल्स जोपासल्यास कॉर्पोरेट, बिझनेस असो की उद्योजकता त्यात टिकून राहता येईल. एएसएमचे चेअरमन डॉ. पाचपांडे यांचा जागतिकस्तरावरील अनुभव आणि शैक्षणिक क्षेत्रातील दूरदृष्टी पहाता नेक्स्ट जेनमध्ये तुमच्या करिअरला घडवायची संधी असल्याचे डॉ. सारडा यांनी विद्यार्थ्यांना ( Next-Gen College) यावेळी सांगितले.
प्राचार्य डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सेवासुविधा यांची माहिती दिली. मुलांना घरी न ठेवता त्यांचा जास्तीतजास्त वेळ कॉलेजमध्ये शिकण्यासाठी राहील, याकडे जातीने लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले.
आरंभ 2025 च्या दोन्ही सत्रात तज्ज्ञ प्राध्यापकांनी अभ्यासक्रम, विविध उपक्रम, शिष्यवृत्ती, सामाजिक आणि क्रीडा आदी स्पर्धा तसेच नवीन शैक्षणिक धोरणातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इंटर्नशिप आदी योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन यावेळी करण्यात आले. डॉ. मधुरा शुक्ला यांनी स्वागत केले. टास्क फोर्सप्रमुख डॉ. डी. डी. बाळसराफ यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी आभार ( Next-Gen College) मानले.





















