मावळ ऑनलाईन –आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह तुतारी घराघरात पोहोचवा. बोगस मतदारांबाबत हरकती घेऊन मतदार याद्या दुरुस्त करण्यासाठी भूमिका घ्या, अशा सूचना युवा नेते युगेंद्र पवार यांनी मावळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिल्या.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार,जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,युवक अध्यक्ष प्रमोदसिंह गोतारने यांच्या उपस्थितीत शनिवारी (२७ सप्टेंबर) वडगाव मावळ येथे बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या बैठकीत पाच पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील जाहीर करण्यात आल्या.
Talegaon: पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोरावडेश्वर डोंगरावरील अमरदेवी मंदिर
Pune: कोंढव्यातील येवलेवाडीत नायजेरियन नागरिकाकडून मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात बुथ कमिटी तयार करून, तुतारी पक्षचिन्ह घराघरात पोहचवणे, स्थानिक तालुका स्तरावर विविध प्रश्नांवर आवाज उठवणे, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आंदोलन करणे व पक्ष वाढवण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी युगेंद्रदादा पवार हे पक्ष संघटना बळकटीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी आगामी काळातील निवडणुका विचारात घेऊन बीएलए नेमणे आणि बोगस मतदारांवर हरकती घेऊन मतदार याद्या दुरूस्त करणे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ,पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग व प्रभारी मावळ अतुल राऊत, युवक अध्यक्ष विशाल वहिले, महिला अध्यक्षा रत्नमालाताई करंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला मा.जिल्हा परिषद सदस्य किसनराव कदम,देहुरोड शहराध्यक्ष मिकी कोचर,वडगाव शहराध्यक्ष सोमनाथ धोंगडे,कामशेत शहराध्यक्ष संतोष वीर,देहु शहराध्यक्ष संदिप शिंदे, तालुका युवती अध्यक्षा गायत्री रिले, उपाध्यक्ष माणिक गाडे, सुनिल शिंदे, सचिन कालेकर, दत्तात्रय गोसावी, काशिनाथ गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, कैलास गोरवे, विजय शिंदे, महेश केदारी, संतोष राक्षे, सुभाष भांडे, नरहरी वाजे,विनोद होगले,आदिनाथ मालपोटे, योगेश करवंदे, सुरज पुरी, अभिजीत शिनगारे, प्रतिक जांभळे, समीर सतेलू, अमोल जांभुळकर, रोहन गाडे, रोहिदास गाडे, अमित घेणंद,राहील तांबोळी यांच्यासह इतर सर्व फ्रंटल व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनोद काळेबाग,गौतम सोनकांबळे व इतर काहींनी पक्षप्रवेश देखील केला.
नव पद नियुक्त्या –
- किसनराव कदम (तालुका कार्याध्यक्ष)
- विजय चंद्रकांत शिंदे (तालुका युवक कार्याध्यक्ष)
- प्रदीप सोपान शिंदे (युवक अध्यक्ष, तळेगाव दाभाडे गाव भाग)
- विशाल राजू पवार (विद्यार्थी अध्यक्ष, तळेगाव शहर)
- सुरज शांताराम मावकर (अध्यक्ष, नाणे मावळ पश्चिम विभाग)