मावळ ऑनलाईन –रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना(Eka Aticha Sansar) विनम्र अभिवादन करून हे स्वर कानी पडले की माणूस आपोआप मंचावर सादर होणाऱ्या कलाकृतीशी जोडला जातो. नुसत्या वाचिक अभिनयाने रसिक प्रेक्षकांना तब्बल एक सव्वा तास स्तब्ध, निःशब्द करून ठेवण्याची किमया साधली कलापिनी रंगवर्धन २०२५ उपक्रमांतर्गत दि. २१ सप्टेंबर रोजी सादर करण्यात आलेल्या “एका अटीचा संसार” ह्या रौप्यमहोत्सवी नाट्य अभिवाचन प्रयोगाने.
एका अटीचा संसार ह्या राजन खान लिखित कथेचे नाट्य रूपांतर केले होते डॉ. सुहास कानिटकर यांनी. सादरकर्ते होते डॉ सुहास कानिटकर, डॉ विनया केसकर आणि विनायक लिमये.
यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ अनंत परांजपे, अभिनेते मोहन खांबेटे, उपाध्यक्ष अशोक बकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Talegaon Dabhade: तळेगाव मधील विशाल शेटे आणि महेश भेगडे बनले आयर्नमॅन
Pune: कोंढव्यातील येवलेवाडीत नायजेरियन नागरिकाकडून मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
हल्ली नात्यांमधील दुरावा, तणाव दूर करण्यासाठी कौन्सिलर्स किंवा लाईफ कोचची मदत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु आपल्याकडे असलेल्या समृद्ध आणि दर्जेदार साहित्यात ही किमया आहे की आपण आपल्या सगळ्या समस्यांवर उत्तरे शोधु शकतो. हे या अभिवाचनाने सिद्ध केले.
एक जोडपे जे लौकिक अर्थाने सुखाने संसार करतात परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात एका घटनेने ते एकमेकांशी संवाद साधतात आणि तेव्हा त्यांना समजते की हे अगदी मनातलं आपण पूर्वीच एकमेकांकडे बोलायला हवं होतं.
अनेक भावभावनांचे पदर ह्या अभिवाचनातून समोर आले. रंगवर्धनच्या रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. विराज सवाई यांनी संयोजन केले. सोनाली पडाळकर रुपाली पाटणकर आणि रामचंद्र रानडे आदींनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.