मावळ ऑनलाईन –शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे( Sharadiya Navratra) यंदाही खंडोबा चौक येथे नवरात्र उत्सवाचा प्रारंभ महिला भगिनींच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठा करून करण्यात आला. शारदीय नवरात्रौत्सव जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जाणाऱ्या नवरात्रोत्सवात दररोज महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
शारदीय नवरात्रौत्सव जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जात आहे. यावर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची आरास केली आहे .यंदा महिला भगिनींसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले ( Sharadiya Navratra) आहेत.

Case of Bribery : पुणे जिल्ह्यात लाच प्रकरणी तिन्ही महिला तलाठ्यांविरुद्ध कारवाई
यामध्ये रासगरबा दांडिया व फॅन्सी ड्रेस स्पर्धा,डान्स स्पर्धा (छोटा गट व मोठा गट),संगीत खुर्ची स्पर्धा,खेळ रंगला पैठणीचा,भव्य लकी ड्रॅा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज आरतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी मानाची साडी लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात येत असते.
उत्सव समितीने नागरिक महिला भगिनींना मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये ( Sharadiya Navratra) सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Vadgaon Maval: भुईकोट किल्ल्यातील कडजाई माता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह
या उत्सवात समाज एकत्रित आल्याने एकजुटीचे दर्शन होऊन सामाजिक ऐक्य व सांस्कृतिक परंपरांचा वारसा जपला जातो असे नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष सौरभ सावले व कार्याध्यक्ष ( Sharadiya Navratra) रोहित गिरमे यांनी सांगितले.