मावळ ऑनलाईन – पिंपरी – तळेगाव स्टेशन परिसरातील ( Talegaon PWD ) सेवाधाम हॉस्पिटलसमोरील खड्डयांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तळेगाव परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात ५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मराठा क्रांती चौकात आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.
Python in Lonavala : लोणावळ्यातील हॉटेल रेडिसन परिसरात साडेनऊ फूट लांबीचा महाकाय अजगर
याबाबत स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, या खड्यांमुळे झालेल्या अपघातांत अनेकांचे जीव गेले, तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग बेशुद्धासारखा बसलेला आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही पीडब्ल्यूडीने दखल घेतली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे आता आम्ही स्थानिक नागरिक पीडब्ल्यूडीला अल्टिमेटम देत आहोत, रस्त्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आंदोलन ( Talegaon PWD ) करणार आहोत.
याविषयी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत म्हणाले, “या खड्यांमुळे होणाऱ्या प्रत्येक अपघाताची थेट जबाबदारी पीडब्ल्यूडीवर टाकली जाईल.” “समस्त तळेगावकर नागरिक या पीडब्ल्यूडीच्या जाचाला कंटाळले असून, पाच ऑक्टोबरला सर्व तळेगावकर एकजुटीने रस्त्यावर उतरणार आहेत.” असे सामाजिक कार्यकर्ते कल्पेश भगत यांनी सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते अच्युत, भगत, सुनील मोरे आणि नितीन फाकटकर हे आंदोलनाचे नेतृत्व करणार ( Talegaon PWD ) आहेत.