मावळ ऑनलाईन – लोणावळा गोल्ड व्हॅली भागातील ( Python in Lonavala) हॉटेल रेडिसनच्या आवारात बुधवारी रात्री तब्बल साडेनऊ फूट लांबीचा महाकाय अजगर आढळून आला. हॉटेल परिसरामध्ये अचानक असा प्रचंड अजगर दिसून आल्यानंतर काही काळ पाहुणे व कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
Sumit Bandale : वडगावच्या सुमित बंडाळेला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक
घटनेची माहिती मिळताच लोणावळा परिसरातील सर्पमित्र मनोहर ढाकोळ, अविनाश राव, कल्पेश तिखे व निलेश तळेगावकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरक्षित पद्धतीने या अजगराला पकडत, तो पुन्हा जंगलात सोडून दिला. हा अजगर नंतर राजमाची परिसरातील कातळदरा जंगल भागामध्ये सोडण्यात आला ( Python in Lonavala) आहे.
गोल्ड व्हॅली हा परिसर डोंगर व जंगलपट्ट्याच्या जवळ असल्यामुळे तेथील हॉटेल परिसरात वन्यजीव वारंवार शिरकाव करतात. अन्नभक्षणाच्या शोधात हा अजगर हॉटेल परिसरात आला असावा, असा प्राथमिक अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला ( Python in Lonavala) आहे.