मावळ ऑनलाईन – “कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता,(Favourite Sher)
एक पत्थर तो तबियत से उछालो यारो.”
– दुष्यंतकुमार
रसिक मित्रांनो, आदाब अर्ज आहे.
गझलेचे गारुड एकदा मनावर चढले की त्या व्यक्तीचे संपूर्ण (Favourite Sher)जीवनच गजलमय होते. पूर्वी गझल म्हणजे फक्त दुःख, मदिरा किंवा प्रेमभंग यांपुरतीच मर्यादित आहे, अशी एक सर्वसाधारण धारणा होती. मात्र, जगातील कुठलीही गोष्ट गझलेत मांडता येते, हे अनेक गझलकारांनी आपल्या अजरामर शेरांमधून सिद्ध करून दाखवले आहे. अशा महान गझलकारांची यादी खूप मोठी आहे.
Diveghat : दिवेघाटात वाहतूक बंद; 26 सप्टेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत मार्ग बंद राहणार
याच यादीतील एक नाव म्हणजे उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे १ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेले दुष्यंतकुमार त्यागी. अलाहाबाद येथे शिक्षण घेतलेल्या दुष्यंतकुमारजींच्या अनेक (Favourite Sher) गझला आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्याच एका गझलेतील हा अजरामर शेर – प्रेरणादायी, नकारात्मकता झुगारून देणारा आणि सकारात्मक वृत्तीने अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा संदेश देणारा.
हा शेर जेव्हा प्रथम कानावर आला, तेव्हाच मला तो प्रचंड भावला होता. जसजसे गझलेवरील प्रेम अधिक उत्कट होत गेले, तसतसा हा शेर मनाला अधिकाधिक प्रेरणा (Favourite Sher) देत राहिला.
खरंच आहे ना, रसिकहो –
“कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता…”
Talegaon News : तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
जगाला अशी प्रेरणा देणारा हा महान शायर, दुर्दैवाने, वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी – म्हणजेच ३० डिसेंबर १९७५ रोजी भोपाळ येथे असताना – देवाघरी गेला.आयुष्यातील नकारात्मकता दूर करून, सकारात्मकतेने अशक्य ते शक्य करून दाखवणे – हीच या महान शायराला खरी आणि योग्य श्रद्धांजली ठरणार (Favourite Sher) नाही का?