situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nitin Bangude-Patil: “देशातील पहिले आरमार उभारणारे छत्रपती शिवराय हे भारतीय नौदलाचे जनक”- नितीन बानगुडे-पाटील

Published On:

मावळ ऑनलाईन – देशातील पहिले आरमार उभारणारेन (Nitin Bangude-Patil) छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत असे सांगत आयुष्यात प्रत्येक प्रसंगाला योग्य नियोजनातून सामोरे गेल्यामुळे छत्रपती शिवराय हे जीवनात यशस्वी होऊ शकले, हे सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांजवळील जिज्ञासा वृत्तीमुळे ते विविध विषयांचे ज्ञाते झाल्याचे गौरोद्गार शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी काढले.

वडगाव मावळ येथील मावळ विचार मंच आयोजित रौप्यमहोत्सवी सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना बानगुडे-पाटील बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पोटोबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे,भाजपाचे सरचिटणीस रामदास गाडे,रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे, व्याख्यानमालेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, मंचाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, यावर्षीच्या सरस्वती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष अजित देशपांडे, उपाध्यक्ष दामोदर भंडारी, कार्यक्रम प्रमुख धनश्री भोंडवे, आरती राऊत, सचिव गिरीश गुजरानी, खजिनदार संतोष भालेराव, अतुल म्हाळसकर आदीसह मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होते.

यावेळी बानगुडे पाटील म्हणाले की, आज ज्या गोष्टी योजना म्हणून शासनाकडून आपल्यापुढे आणल्या जात आहे, त्यांची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केलेली दिसते. मग ते जलसंधारण धरणे बांधणे, पाणी आडवा,पाणी जिरवा, जमीन मोजणी,अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे असो, विधवा महिलांसाठी फॅमिली पेन्शन योजना, राज्य राखीव दल, अशा अनेक गोष्टींची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली होती. इतकेच नाही तर देशातील पहिले आरमार उभारणारे नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. असे अनेक दाखले शिवव्याख्याते बानगुडे पाटील यांनी देत विचारांचा जागर दुसरे पुष्प गुंफताना केला. यावेळी उपस्थित सर्व श्रोते मंत्रमुग्ध होत अनेकांनी जय शिवाजी जय भवानी असा जयघोष करत होते.




Talegaon Dabhade: आई आणि बहिणींकडून मानसिक छळ, एकाची आत्महत्या

Teacher Merit Award: राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने रामवाडीचे सुपुत्र अनिल गलगले पुरस्कारित

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ध्येय, जिज्ञासावृतीने व नियोजन करून केली. त्यामुळे ते यशस्वी झाले. म्हणूनच आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य नियोजन केले पाहिजे. शिवाजी राजे हे व्यवस्थापन नियोजनाचे विश्वगुरू आहेत असेही बानगुडे पाटील यांनी यावेळी सांगितले.

सर्वच लढाया तलवारीने जिंकता येत नाही…

हार न मानता जोपर्यंत ध्येय गाठत नाही, तोपर्यंत चालत राहिले पाहिजे. सर्व लढाया तलवारीने जिंकता येत नाहीत. बुद्धीच्या जोरावर काही लढाया जिंकायच्या असतात. कोणतीही गोष्ट करताना एकाच पर्यायावर अवलंबून राहू नका. अनेक पर्याय निर्माण केले पाहिजेत. जे स्वतःच्या पायावर उभे राहतात ते कधीही ढासळत नाहीत, असेही बानगुडे पाटील म्हणाले.

तळेगाव दाभाडे रोटरी क्लब सिटीचे संस्थापक व उद्योजक विलास काळोखे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.

सन्मान पत्राचे वाचन सपना किरण म्हाळसकर यांनी केले.अनंता कुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कुलदीप ढोरे यांनी आभार मानले.

Follow Us On