मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द येथील जमिनीच्या व्यवहारात ( Lonavala Crime News ) बनावट इसम उभा करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, वडगाव मावळ येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पी. रशीद उर्फ पी. रशीद अब्दुला (वय 40, व्यवसाय कापड व हॉटेल व्यवसाय, रा. सागर हॉटेल, हॉल) हे यामध्ये नुकसानग्रस्त ठरले आहेत. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या नावाचा बनावट आधार घेऊन तोतया इसम उभा केला. त्याच्याद्वारे फिर्यादींच्या नावाने ओळखपत्र तयार करून जमीन व्यवहार राबविण्यात आला.
मौजे टाकवे खुर्द, ता. मावळ, जि. पुणे येथील गट नं. 89 क्षेत्र ७९.२० आर इतकी शेतीजमीन ही फिर्यादींच्या नावे असून त्यावर शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई (शाखा – धनकवडी) यांचा बोजा असल्याचे आरोपींना माहीत होते. तरीही, आरोपी उत्तम हरिदास पाटील व भगत संदीप पंजाबराव यांना खरेदीदार दाखवून, तर विशाल अशोक लोहार व चंद्रमोहन मसीन यांना साक्षीदार बनवून हा खोटा ( Lonavala Crime News )व्यवहार करण्यात आला.
Prakash Devle : प्रतिशिर्डीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश देवळे यांचे निधन
विशेष म्हणजे, खरेदीखत लिहून देणारा इसम खरा आहे की तोतया याची खात्री न करता, व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून, दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ येथे कार्यरत असलेले श्री. कपील मोरे यांनी दस्त क्र. १२३८०/२०२५ अन्वये खरेदीखत नोंदवून दिले.
या प्रकारामुळे फिर्यादींच्या मालकीच्या जमिनीवर खोट्या व्यवहाराची नोंद झाल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला ( Lonavala Crime News ) आहे.