मावळ ऑनलाईन – साई संस्थान प्रतिशिर्डी शिरगावचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश देवळे यांचे ( Prakash Devle ) मंगळवार, दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता दुःखद निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
Pune: अनिल टांकसाळे यांना दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार
अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव आज, बुधवार दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता शारदाश्रम आश्रमशाळा, शिरगाव येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार ( Prakash Devle ) आहे.
MLA Sunil Shelke : रोजगार हमी योजनेचे लाभ वेळेवर न पोचल्यास संबंधितांना जबाबदार धरणार – आमदार सुनील शेळके
प्रकाशजी देवळे यांनी शिरगाव परिसरात साई संस्थान प्रतिशिर्डीची स्थापना करून धार्मिक व सामाजिक कार्याला नवे परिमाण दिले. त्यांच्या कार्यामुळे हजारो भक्तांना श्रद्धास्थान लाभले. देश विदेशातून साई भक्त येऊ लागल्याने मावळच्या पर्यटन विकासाला चालना मिळाली.
1996 मध्ये विधान परिषदेवर निवडून येत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव करून राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला. ते शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख, बांधकाम व्यावसायिक तसेच ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील कलावंत म्हणूनही परिचित होते.
मराठी चित्रपट ‘मायेची सावली’ चे निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणून त्यांची कलात्मक ओळख होती. ‘कलायात्री शिक्षण संस्था’ स्थापन करून त्यांनी भटक्या-विमुक्त समाजातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अलीकडेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा ‘समाज भूषण पुरस्कार’ मिळाला होता.