मावळ ऑनलाईन – विधानभवनात मंगळवारी झालेल्या रोजगार हमी योजना समितीच्या बैठकीत आमदार सुनील शेळके ( MLA Sunil Shelke) यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. शेतकरी व कष्टकऱ्यांना योजनांचे लाभ वेळेवर मिळालेच पाहिजेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे त्यांनी कठोर शब्दांत स्पष्ट केले.
Pune: अनिल टांकसाळे यांना दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार
या बैठकीत अकोला जिल्ह्यातील प्रलंबित कामांची गंभीर स्थिती उघड ( MLA Sunil Shelke) झाली. सन २००७ मध्ये मान्य झालेल्या सिंचन विहिरींची कामे अद्याप अपूर्ण असून काही ठिकाणी काम पूर्ण झाले तरी निधी उपलब्ध करून दिला गेलेला नाही. सामाजिक वनीकरण विभागाचे वास्तवही धक्कादायक असून, जिवंत झाडांची माहिती चिंताजनक आहे. एवढेच नव्हे तर २०१९ पासून विभागाने एकही रोपवाटीका उभारलेली नाही.

रेशीम विभागातील कामे देखील वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. २०१८ ते २०२२ दरम्यान अकोट, बाळापूर-मुर्तिजापूर व पातुर तालुक्यांमध्ये मंजूर झालेली अनेक कामे तीन वर्षे उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. प्रधानमंत्री आवास योजनेत तब्बल २५६ घरकुलांची कामे पूर्ण झालेली असतानाही लाभार्थ्यांना हक्काचे हप्ते मिळालेले नाहीत. रस्त्यांच्या कामांची स्थितीही तितकीच निराशाजनक आहे. २०१६ ते २०२२ दरम्यान मंजूर झालेली रस्त्यांची कामे आजतागायत प्रलंबित आहेत, तर शेतरस्त्यांमध्ये आढळलेल्या अनियमिततेवर चौकशी पूर्ण होऊनही कारवाई झालेली ( MLA Sunil Shelke) नाही.
Pune: अनिल टांकसाळे यांना दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार
या साऱ्या बाबींवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी आणि कष्टकरी यांना योजनांचे लाभ वेळेवर मिळाले नाहीत, तर दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल, असा ठाम इशारा त्यांनी दिला. शेतकरी राजा वंचित राहू नये, त्याचे हित जपणे हीच समितीची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीला समितीचे सदस्य सुरेश खाडे, अमोल जावळे, राजेश वानखेडे, काशिनाथ दाते, संजय देरकर, नितीन देशमुख, शिरीषकुमार नाईक, बापुसाहेब पठारे, किशोर दराडे यांच्यासह ( MLA Sunil Shelke) संबंधित विभागांचे प्रधान सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.