मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील माळेगाव बु येथे क्षुल्लक ( Maval Crime News)कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Naigaon Crime News : नायगाव येथे रिक्षाचालकाला मारहाण
फिर्यादी करण रखमाजी काठे (वय 24, व्यवसाय शेती, रा. तळपेवाडी, माळेगाव बु, ता. मावळ) यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, ( Maval Crime News)त्यांच्या भावाने अविनाश याने माळेगाव येथील एस.टी. स्टॅन्ड जवळ लघवी केल्याच्या कारणावरून गावातील स्वप्नील गौतम घाडगे व किरण गौतम घाडगे (दोघे रा. माळेगाव बु) यांनी वाद घातला.
Metro Station : महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन ते तळजाई देवी मंदिर बसमार्ग सुरू
या प्रकरणात फिर्यादी काठे व त्यांचे नातेवाईक यांनी घाडगे यांच्या घरी जाऊन “लघवीच्या कारणावरून तुम्ही शिवीगाळ व मारहाण का केली?” असा जाब विचारला असता अचानक स्वप्नील घाडगे याने जवळ पडलेले लाकडी दांडके उचलून अविनाशच्या डोक्यात मारहाण केली. यामध्ये अविनाश जखमी झाला. त्याचवेळी किरण घाडगे याने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून धमकी दिली.
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस ( Maval Crime News) करत आहेत.