मावळ ऑनलाईन – सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान कडून(Talegaon Dabhade) आयोजित केलेल्या सन २०२५ मधील सार्वजनिक गणेशोत्सवात आयोजित केलेल्या विविध देखाव्यांच्या स्पर्धांमध्ये मंगलमूर्ती अवॉर्डचे मानकरी ठरले डोळसनाथ कॉलनी मित्र मंडळ,जिजामाता चौंक.
येथील नाना नानी पार्कमध्ये (दि.२०)रोजी आयोजित पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षपदी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुनील शेळके,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,महिला राष्ट्रवादी शहराध्यक्षा शैलजा काळोखे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश ओसवाल,प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील, अध्यक्ष दीपक दाभाडे,श्रीमंत सत्यशिलराजे दाभाडे, माजी तहसीलदार रामभाऊ माने, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके,नगरसेवक निखिल भगत, विशाल दाभाडे, शोभा भेगडे, अण्णासाहेब दाभाडे, रजनी ठाकूर, संजय बाविस्कर सह मान्यवर उपस्थित होते.
Talegaon Dabhade: आई आणि बहिणींकडून मानसिक छळ, एकाची आत्महत्या
Teacher Merit Award: राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने रामवाडीचे सुपुत्र अनिल गलगले पुरस्कारित
यावेळी मान्यवरांनी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी उत्सव आणि परंपरा या कायम राहिल्या पाहिजे ते साजरे करताना कोणालाही त्यापासून त्रास होता कामा नये याची काळजी घेणं हे आयोजकाचं काम असतं. तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे यांच्या पुढील कार्याला यश द्यावे अशी गणराया चरणी प्रार्थना करतो.असे शेळके म्हणाले.
यावेळी स्वागत दीपक दाभाडे यांनी केले सूत्रसंचालन ॲड विनय दाभाडे यांनी केले. आभार आनंद दाभाडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला.
देखव्यानुसार विजयी मंडळांची नावे पुढीलप्रमाणे –
मंगलमूर्ती अवॉर्ड २०२५ – डोळसनाथ कॉलनी मित्र मंडळ,जिजामाता चौक तळेगाव दाभाडे,
हलता देखावा विभाग –
१) प्रथम क्रमांक:मुरलीधर मित्र मंडळ,खळदे आळी,
२)व्दितीय क्रमांक: आझाद मित्र मंडळ,भोईआळी,
स्थीर देखावा विभाग -१) प्रथम क्रमांक: फ्रेंड्स क्लब मित्र मंडळ, तेली अळी, २)व्दितीय क्रमांक: श्री राज शिवछत्रपती मित्र मंडळ,भेगडे आळी,३) तृतीय क्रमांक : श्रीनगरी मित्र मंडळ, श्रीनगरी
जिवंत देखावा विभाग १) प्रथम क्रमांक: भेगडे तालीम मित्र मंडळ, भेगडे आळी,२) व्दितीय क्रमांक: अ) जिजामाता चौक मित्र मंडळ, जिजामाता चौक, ब) शाळा चौक मित्र मंडळ, शाळा चौक, ३) तृतीय क्रमांक:अ) शेतकरी तरुण मंडळ, कुंभार आळी, ब) हिंदू राज मित्र मंडळ साने अळी यांना देण्यात आले.
या शिवाय यावेळी विशेष पुरस्कार देण्यात आले. यामध्ये मानाचे पाच गणपती, ढोल ताशा वादन सेवा पुरस्कार,मिरवणूक चित्ररथ पुरस्कार, मिरवणूक सामाजिक संदेश पुरस्कार,गो. नी. दांडेकर पुरस्कार याचा समावेश होता.





















