मावळ ऑनलाईन –रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आयोजित(Talegaon Dabhade) श्री क्षेत्र शेगाव श्री गजानन महाराजांचे दर्शन,श्री क्षेत्र शिर्डी श्री साईबाबांचे दर्शन व श्री क्षेत्र शनिशिंगणापूर श्री शनि महाराजांचे दर्शन अशी देवदर्शन सहल भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली असून सहलीत ४० मेंबर्सचा सहभाग होता.रोटेरियन्स मेंबर्सनी बसमध्ये गाणी,मनसोक्त गप्पा गोष्टी, उखाणे,नृत्ये,भजन, गाण्याच्या भेंड्या सादर करताना मनमुराद आनंद घेतला.
सहली या मानवी जीवनातील दुःख विसरून लहानपणीच्या सुखद आठवणींचे स्मरण देणाऱ्या आनंदाच्या अनुभूती असतात तर देवदर्शनातून मनाला सुख, शांती आणि समाधान मिळते असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना सहलीतील अविस्मरणीय क्षण सांगितले. रोटरी सिटीची सहल अतिशय आनंददायी झालीअसून श्री क्षेत्र शेगाव येथे सर्व मेंबर्सना श्री गजानन महाराजांच्या दर्शना बरोबर महाआरतीचा लाभ मिळाला. सर्व मेंबर्सनी भक्तिभावाने श्री गजानन महाराज,श्री साईबाबा,श्री शनि महाराजांचे दर्शन घेतले.रोटरी सिटी हा आमचा एक परिवार असून प्रतिवर्षी विविधांगी कार्यक्रम घेताना देवदर्शन करून रोटरी वर्षाला सुरुवात केल्यावर क्लबची कारकीर्द यशस्वी होते असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी करताना सहलीच्या आठवणी विशद केल्या.


Pune: पुणे रेल्वे स्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’ मोहिमेत तब्बल 51 लाखांचा बेकायदेशीर रोकडजमा जप्त
अध्यक्ष भगवान शिंदे, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, सेक्रेटरी संजय मेहता, ट्रेनर सुरेश शेंडे,प्रकल्प प्रमुख प्रसाद बानगुडे, प्रकल्प प्रमुख संजय वाघमारे, संग्राम जगताप, सचिन भांडवलकर, रघुनाथ कश्यप, राजेश बारणे, विश्वास कदम, डॉ.मिलिंद निकम,संजय भागवत, मनोज ढमाले,मोहन खांबेटे, आनंदराव रिकामे,तानाजी मराठे, डॉ.गणपत जाधव, वैशाली लगाडे,सूर्यकांत म्हाळसकर, दिनेश निळकंठ, दशरथ ढमढेरे,कमल ढमढेरे, विलास वाघमारे, सुनंदा वाघमारे इत्यादी सह अन्स,ॲनेट्स यांनी देवदर्शन सहल उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. रोटरी सिटीचे मेंबर शेगाव निवासी डॉ वैभव पाचपोर यांचे विशेष सहकार्य मिळाले.