रेल्वेमार्गाला तीव्र विरोध…
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन ( Indore Railway Line) या नव्या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे इंदोरी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात जागा संपादित होत असून, यामुळे गावातील शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हा रेल्वेमार्ग इंदोरी गावातून वगळण्यात यावा, अशी मागणी इंदोरी ग्रामस्थ व कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
Rotary Club of Pune : सकारात्मक समाजकार्य उभारण्यासाठी मोठी स्वप्ने पहा – शेखर मेहता
यासंदर्भात रविवारी (दि.२१) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत ढोरे, बबनराव ढोरे, दामोदर शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप ढोरे,अशोक मराठे,प्रशांत भागवत, सरपंच शशिकांत शिंदे, दत्तात्रय ढोरे,कृती समितीचे अध्यक्ष स्वप्निल भागवत,प्रसाद ढोरे,निखिल पानसरे,अमोल ढोरे,तुषार शिंदे, संदीप शिंदे,मयूर पानसरे ( Indore Railway Line) आदींच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला.
Tungai Temple : तुंग गडावर आई तुंगाई देवळात घटस्थापना, साजरा होणार शारदीय नवरात्रोत्सव
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार जमीन संपादनाच्या दृष्टीने पुढील ( Indore Railway Line) कार्यवाही सुरू होणार आहे. प्रस्तावित रेल्वेमार्ग हा इंदोरी गावाच्या बाजूने जात असल्याने इंदोरी गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन यासाठी संपादित होणार आहे.
वास्तविक इंदोरी येथील जमीन ही बागायती असून, यापूर्वी गावातील शेतकऱ्यांनी तळेगाव-चाकण बाह्यवळण महामार्ग,रिंगरोड,शेल लाईन,एच.पी.लाईन अशा विविध प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे ( Indore Railway Line) आधीच अल्पभूधारक झालेले शेतकरी आता रेल्वेमुळे होणाऱ्या जमीन संपादनामुळे भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हा रेल्वे मार्ग आमच्या गावातून नकोच अशी भूमिका घेत इंदोरी ग्रामस्थांनी या रेल्वेमार्गाला तीव्र विरोध केला आहे.
यासंदर्भात कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वेमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात ( Indore Railway Line) आला आहे.