मावळ ऑनलाईन – आश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीपासून ( Tungai Temple) ते नवमी तिथीपर्यंत साजरा होणारा शारदीय नवरात्रोत्सव सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) पासून मोठ्या भक्तिभावाने सुरू झाला आहे. यानिमित्त गावोगावच्या देवी मंदिरांत तसेच अनेक भक्तांच्या घरांमध्ये विधीवत घटस्थापना करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील दुर्गसेवकांनीही किल्ले तुंग गडावरील आई तुंगाईच्या देवळात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करून नवरात्रोत्सवाची सुरुवात केली.
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र (मावळ तालुका) या संस्थेमार्फत दरवर्षी दुर्ग संवर्धनाबरोबरच धार्मिक परंपरा जपण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून यंदाही तुंग गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी देवीच्या राऊळात घटस्थापना व महाआरती केली. यावेळी गडावर वातावरणात धार्मिक भावनेचे व भक्तिभावाचे ( Tungai Temple) अनोखे दर्शन घडले.
सदर नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आगामी नऊ दिवस तुंग गडावर सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये देवीच्या विविध रुपांची पूजाअर्चा, महाआरती, जप, ध्यान, भजन तसेच दुर्ग संवर्धनाविषयीचे ( Tungai Temple) उपक्रम राबविण्यात येतील.
हिंदू धर्मात नवरात्रोत्सवास विशेष महत्त्व असून, दुर्गामातेच्या नऊ रुपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. उपवास, जप, ध्यान, आरती, गरबा यांसह भक्तीपर उपक्रमांचा यात समावेश असतो. यंदा २५ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार असून, तुंग गडावरील हा पारंपरिक उत्सव परिसरातील भाविकांसाठी मोठे आकर्षण ठरणार ( Tungai Temple) आहे.