मावळ ऑनलाईन – कामशेत रेल्वे स्थानकाजवळ (Suicide Attempt) सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) रात्री इंद्रायणी नदीत एका वयस्कर इसमाने आत्महत्या करण्याच्या हेतूने उडी मारली होती. मात्र, वन्यजीव रक्षक मावळ यांच्या तत्पर व धाडसी बचावकार्यातून त्याचा जीव वाचविण्यात आला. ही घटना रात्री सुमारे सव्वा नऊच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, कामशेत स्टेशन परिसरातून अचानक मदतीसाठी ओरडण्याचा आवाज आल्याने पोलिस पाटील जाधव यांनी तत्काळ त्या दिशेने धाव (Suicide Attempt) घेतली. त्यांनी आवाज नदीच्या दिशेने येत असल्याचे ओळखले. नदीत एक इसम बुचकळ्या खात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित कामशेत पोलिस चौकीला फोन करून घटनेची माहिती दिली.
Rashi Bhavishya 23 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
यानंतर घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ पथक घटनास्थळी पोहोचले. रशी व लाईफ जॅकेट घेऊन बचावकार्य करण्यात आले. यामध्ये शुभम आंद्रे, सचिन शेडगे व किशोर लष्कर यांनी जीव धोक्यात घालून नदीत उडी घेतली व बुचकळ्या खात असलेल्या इसमाला बाहेर (Suicide Attempt) काढले.
सदर इसमाने आपले नाव काशिनाथ भीमा मेरगळे (वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे, मूळ रा. विजापूर जिल्हा, सध्या रा. चाकण) असे सांगितले. परिस्थितीला वैतागून हे टोकाचे पाऊल उचलले असे ही त्यांनी सांगितले.
या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलिस करीत आहेत. स्थानिक पोलिस पाटील व वन्यजीव रक्षक मावळ चे अनिल आंद्रे,शुभम आंद्रे, किशोर लष्कर, सचिन शेडगे यांनी ही कामगिरी (Suicide Attempt) केली.