मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील टाकवे गावात एक अत्यंत ( Bombay Sacilian) दुर्मिळ उभयचर प्राणी आढळून आल्याने परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक वन्यजीव रक्षक आणि पर्यावरणप्रेमींच्या तत्परतेमुळे या प्राण्याचा यशस्वी बचाव करण्यात आला.
Firangayee Devi : फिरंगाई देवी मंदिरात घटस्थापना
घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, टाकवे गावातील एका बांधकामस्थळाजवळील ( Bombay Sacilian) पाण्याच्या टाकीत साप असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. याबाबतचा तातडीचा कॉल शिवदुर्ग मित्र टीम व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य रोहिदास कालेकर यांना करण्यात आला. कालेकर आणि जिगर सोलंकी हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष पाहणी केली असता, तो साप नसून ‘बॉम्बे सॅसीलियन’ (Bombay Caecilian – Limbless Amphibian) असल्याचे स्पष्ट झाले.
सोलंकी यांनी प्राथमिक तपासणी केली असता या दुर्मिळ प्राण्याला( Bombay Sacilian) कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे आढळले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पकडून मानवी वस्तीपासून दूर, नैसर्गिक अधिवास असलेल्या परिसरात सोडण्यात आले.
Maza Bappa Gharoghari : ‘माझा बाप्पा घरोघरी’ स्पर्धेतील विजेत्यांनी जिंकली नारायण पेठ साडी
सॅसीलियन हा एक उभयचर प्राणी असून, त्याला पाय नसतात. त्याचे शरीर लवचिक व मऊसर असते. जमिनीखालील अंधाऱ्या व ओलसर वातावरणात ( Bombay Sacilian) राहणे, तसेच कीटक व लहान जीव खाऊन जीवन जगणे ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे जमिनीतील पर्यावरणातील कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम तो करतो. विशेष म्हणजे, सॅसीलियन हा पश्चिम घाटात आढळणारा स्थानिक प्राणी असून, त्याचे दर्शन फारच क्वचित घडते.
पर्यावरणशास्त्रज्ञ सागर महाजन यांनी सांगितले की, “सॅसीलियन हा अतिदुर्मिळ, संवेदनशील आणि परिसंस्थेसाठी महत्त्वाचा प्राणी आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे.”
या घटनेतून स्थानिक पर्यावरण रक्षक व बचाव कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे एक दुर्मिळ प्राणी पुन्हा सुरक्षितपणे निसर्गाच्या अधिवासात परतला ( Bombay Sacilian) आहे.