मावळ ऑनलाईन –बैल शेतातील मशागतीची सर्व कामे करतो म्हणून (Vadgaon Maval)त्याला शेतकऱ्याचा सखा म्हटले जाते. बैल पोळ्याच्या दिवशी या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. आधुनिक काळात बैलांची जागा ट्रॅक्टर आणि मशिनरीने घेतली आहे. त्यामुळे आधुनिक काळात शेतकऱ्यांना मशागतीसाठी उपयोगी ठरणाऱ्या ट्रॅक्टरबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. वडगाव शहरात शेतकरी तुषार वहिले, विशाल वहिले कुटुंबाने ट्रॅक्टरला आकर्षकपणे सजवून त्यांची पूजा केली. या अनोख्या पोळ्याची तालुक्यात चर्चा सूरू आहे.
वडगाव शहरातील प्रगतशील शेतकरी तुषार वहिले व विशाल वहिले व कुटुंबांतील सुवासिनींनी त्यांच्या ट्रॅक्टरचे पूजन व आकर्षक सजावट करून ट्रॅक्टर पोळा साजरा केला. वडगावमध्ये बैलांबरोबर ट्रॅक्टरचीही वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
Talegaon Dabhade: मावळ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यंदाही कृष्णराव भेगडे स्कूलच्या मुली अव्वल
Pune:’वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अंधश्रद्धा नसून हिंदुत्वाचा सर्वोच्च बिंदू – संजय उपाध्ये
बळीराजाचा पारंपारिक सण बैलपोळा हा मोठा उत्साहात साजरा होत असतो. आजच्या या युगात आधुनिक शेतीमध्ये बैलांप्रमाणेच ट्रॅक्टरचे ही महत्व वाढल्याने वर्षभर शेतात व व्यवसायात साथ देणारे ह्या यांत्रिक मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आगळावेगळा ट्रॅक्टर पोळा साजरा केला आहे.
शेती पद्धतीमध्ये दिवसेंदिवस बदल होत असताना दिसत आहे. शेतीला आधुनिकतेची जोड मिळत असून शेतात नांगर पेरणी,नांगरणी,रोटरने अशा व इतर कामासाठी यंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे ट्रॅक्टर हा आधुनिक शेतीचा कॉमन फॅक्टर बनला आहे.
या ट्रॅक्टर पोळ्यात शेतकरी तुषार वहिले व विशाल वहिले यांच्या मातोश्री श्रीमती विमलताई वसंतराव वहिले,कीर्तीताई तुषार वहिले, माजी उपनगराध्यक्ष पूजाताई विशाल वहिले आणि सर्व कुटुंबीय आनंदाने सहभागी झाले होते.