situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Karla Gad : कार्ला गडावर शारदीय नवरात्र उत्सवासाची जय्यत तयारी ; लाखो भाविकांच्या स्वागताला देवस्थान सज्ज

Published On:
Ekvira Devi Temple

मावळ ऑनलाईन – महाराष्ट्रातील कोळी-आगरी समाजाची ( Karla Gad) कुलस्वामिनी व जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री आई एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला येत्या २२ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी गडावर येणार असून, त्यांच्या सोयीसाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने व्यापक तयारी केली आहे. भाविकांना अडचण न होता सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी विशेष उपाययोजना केल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी दिली.

Bhadrapad Bailpola : मावळ तालुक्यात भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा

नवरात्रोत्सव काळात मंदिर पहाटे ४ वाजता ते रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार असून, भाविकांची संख्या लक्षात घेता दर्शन वेळेत आवश्यकतेनुसार वाढ ( Karla Gad)केली जाणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर गड पायथ्यापासून व्हीआयपी पार्किंगपर्यंत पायऱ्यांवर शेड, रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पायऱ्यांवर रात्री व पहाटे उजेड राहावा यासाठी लाईट व्यवस्था, भाविकांच्या सोयीसाठी ३० मोबाईल स्वच्छतागृहे, तसेच मोफत बिसलेरी पाणी वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात आले असून, स्थानिक भाविकांसाठी वेगळी दर्शनरांग ठेवली आहे. गडावर ११ दिवस अन्नदान, प्रसाद वितरण व आरोग्य सुविधा उपलब्ध असतील.

Yerawada Suicide News : येरवड्यात पत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

भाविकांसोबत त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत ( Karla Gad) असल्याने पार्किंगची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. गडावरील पार्किंग, रस्त्याच्या कडेला एक लेन पार्किंग, तलावाजवळ दुकानामागील पार्किंग तसेच मोठ्या वाहनांसाठी कार्ला फाटा येथील महाराज अग्रसेन पॅलेस येथे पार्किंगची सोय केली आहे. गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालून ही वाहने द्रुतगती मार्गावरून वळविण्याचे आदेश दिले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने लोणावळा ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, गड परिसरात जागोजागी पोलिसांची नियुक्ती होणार ( Karla Gad) आहे.

उत्सवाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

२२ सप्टेंबर : सकाळी ७.३० वा. घटस्थापना (अभिषेकानंतर)

दररोज सकाळी ६ वा. : देवीचा अभिषेक

२६ सप्टेंबर : ललित पंचमी

२९ सप्टेंबर : महालक्ष्मी पूजन

३० सप्टेंबर : दुर्गाष्टमी पूजन

१ ऑक्टोबर : पहाटे ५.३० वा. महानवमी होम

२ ऑक्टोबर : दैनंदिन अभिषेक, विजया दशमी व दसरा सोहळा

याशिवाय संपूर्ण उत्सव काळात सप्तशती पठण होणार असून, भाविकांसाठी दिवसरात्र सोयीची सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे देवस्थानकडून सांगण्यात ( Karla Gad) आले.

Follow Us On