मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कामशेत येथील ( Kamshet)शिवाजी चौकात उशिरा रात्री एका तरुणावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी(दि.20) घडली आहे. पाच ते सहा अनोळखी इसमांनी फिर्यादीवर फायटरसारख्या धारदार हत्याराने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून, शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची नोंद झाली आहे. या प्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश सुरेश धरकुडे (वय ३६, रा. वळवंती, ता. मावळ, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी चौकात उभे असताना, मोटारसायकलवरून आलेले तीन तर अन्य दोन ते तीन जणांसह एकूण पाच ते सहा अनोळखी युवकांनी बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला केला.
Talegaon Dabhade: मावळ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यंदाही कृष्णराव भेगडे स्कूलच्या मुली अव्वल
Pune:’वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अंधश्रद्धा नसून हिंदुत्वाचा सर्वोच्च बिंदू – संजय उपाध्ये
यातील एकाने आपले नाव “लालगुडे” असल्याचे सांगून “माझ्या नादी लागू नकोस, तुला खूप माज आला आहे का?” अशी धमकी दिली. त्यानंतर लालगुडे याने हातातील फायटरसारख्या हत्याराने वार केले, तर सोबतच्या अनोळखी साथीदारांनी फिर्यादीच्या तोंडावर, गालावर, डोळ्यावर, ओठावर, मानेवर तसेच दोन्ही पायांवर लाथाबुक्क्यांनी व फायटरने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.