मावळ ऑनलाईन – दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे शिष्य, जुन्या पिढीतील कवी व भगवद्गीतेच्या अभ्यासक श्रीकृष्ण विनायक पानसे (Shrikrishna Panse वय ८५) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक लोणावळा टाईम्सचे संपादक प्रसाद पानसे यांचे ते वडील होत.
श्रीकृष्ण पानसे (Shrikrishna Panse) यांनी लिहिलेल्या कवितांचा ‘वीणा झंकार’ हा संग्रह प्रकाशित झाला आहे. हिंदू धर्म परंपरा या विषयावर संशोधन करून त्यांनी लेखन केले होते. ते लवकरच पुस्तक रूपाने प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. साहित्य कला संस्कृती मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. रामदास स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या सर्व संत सत्संग मंडळाचे ते संस्थापक होते.
तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.