मावळ ऑनलाईन –देशाच्या विकासात नवी पिढी घडविण्याचे(Talegaon Dabhade) महत्त्वाचे काम शिक्षकांकडून होत असून अशा शिक्षकांना समाजाने सन्मानित केले पाहिजे असे प्रतिपादन इंद्रायणी महाविद्यालयाचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केले.
सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळातील शिक्षकांचा गौरव करताना अध्यक्षीय भाषण करताना शेटे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे,इतिहास व्याख्याते डॉ. प्रमोद बोराडे, प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील,अध्यक्ष दीपक दाभाडे, भाजप प्रांतिक सदस्य ज्योती जाधव,तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष विजय काळोखे, नगरसेवक शोभा भेगडे,सुरेश दाभाडे, नीलिमा दाभाडे,निर्मला पोटे,निर्मला दाभाडे, रजनी ठाकूर, शोभा परदेशी,लक्ष्मण माने, अनिल फाकटकर आदी उपस्थित होते.
यावेळी पाकीजा मुलाणी,संतोष बच्चे या शिक्षकांनी तसेच ज्योती जाधव डॉ. प्रमोद बोराडे, विजय काळोखे,चित्रा जगनाडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रशासन अधिकारी म्हणून काम करताना शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभते असे मत शिल्पा रोडगे यांनी व्यक्त केले. स्वतःच्या कामाचा व्याप सांभाळून शासकीय योजना शिक्षक काळजीपूर्वक पूर्ण करतात. याचे कौतुक संतोष दाभाडे यांनी केले. तर ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त फक्त आदर्श शिक्षक हा पुरस्कार दिला जातो. सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगरपरिषद शिक्षण मंडळातील सर्व शिक्षकांना सन्मानित केल्याबद्दल चंद्रकांत शेटे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. तसेच संस्थापक संतोष दाभाडे यांच्या निर्मलवारी कार्यक्रमाची स्तुती करून काम करत राहिल्यास मोठ्या पदावर निश्चित जाता येते अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
Lonavala : श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सव
Nisha Balve: निशा बालवे ठरली महाराष्ट्राची सौंदर्यवती
स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे यांनी केले प्रास्ताविक ॲड. विनय दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन निकिता शितोळे,प्राची लोमटे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष आनंद दाभाडे यांनी केले.