मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- शालिवाहन शके १९४७. विश्वावसुनाम संवत्सर. महिना : भाद्रपद. कृष्णपक्ष. तिथी – १५. तारीख – २१.०९.२०२५.
वार – रविवार (Rashi Bhavishya 21 Sept 2025)
शुभाशुभ विचार – अमावस्या वर्ज्य.
आज विशेष- सर्वपित्री अमावस्या, अमावस्या श्राद्ध.
राहू काळ – सायंकाळी ४.३० ते ६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- पूर्वा फाल्गुनी ०९.३२ पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी. चंद्र राशी – सिंह १५.५८ पर्यंत नंतर कन्या.
मेष – ( शुभ रंग – मोरपिशी) Rashi Bhavishya 21 Sept 2025
काही महत्त्वाची कामे असतील तर आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी थोडा थकवा जाणवेल. विरोधक तुमच्या चुका शोधत आहेत.
वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
आज जमिनी संबंधित व्यवहार तुमच्या अपेक्षेनुसार होतील. पारिवारिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आज व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल.
मिथुन – ( शुभ रंग- भगवा)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणं गरजेचे आहे. नवीन ओळखीत लगेच कोणावर विश्वास टाकू नका. कलावंतांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.
कर्क – ( शुभ रंग – जांभळा)
तुमची आर्थिक स्थिती भक्कम असेल विवाह इच्छुकांना उत्तम स्थळांचे प्रस्ताव येतील. स्पष्टवक्तेपणामुळे जवळच्या नात्यात काही गैरसमज होतील.
सिंह -( शुभ रंग – पांढरा) Rashi Bhavishya 21 Sept 2025
आज तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल दिवस असून व्यावसायिक अडचणी दूर होतील. आज जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. विरोधकांची पीछेहाट होईल.
कन्या – ( शुभ रंग- हिरवा)
आज कंजूषणास लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. पासपोर्ट, विजा संबंधित कामातील काही अडचणी दूर होतील.
तूळ ( शुभ रंग- निळा)
आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण होत असताना उद्योग व्यवसायात काही मनासारख्या घटना घडतील. महत्त्वाची कामे दुपार पूर्वीच उरकून घ्यावीत. छान दिवस.
वृश्चिक ( शुभ रंग – लाल)
राशीच्या दशमात चंद्रभ्रमण सुरू असताना आळस झटकून कामाला लागावे लागते. आज रिकाम्या गप्पा टाळून तुम्ही कर्तव्याला प्राधान्य द्याल. दुपारनंतर एखादा लाभ संभवतो.
Nashik Phata: अपघातानंतर ऑडी कार जळून खाक, नाशिक फाटा येथील प्रकार
धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 21 Sept 2025
राशीच्या भाग्यात चंद्रभ्रमण सुरू असताना तुमच्यासाठी प्रसन्न दिवस आहे. अध्यात्मिक उन्नतीकडे पावले वळतील. आज सज्जनांचा सहवास लाभेल.
मकर (शुभ रंग- मोतिया)
आज कोणतीही धाडसाची कामे टाळा. आज जोडीदाराला लाभ होतील. स्वतःच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यवसायात मोठे आर्थिक धाडस नको.
कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. इतरांच्या विचारांशी जमवून घेणे अवघड जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे.
मीन ( शुभ रंग- गुलाबी)
ज्येष्ठ मंडळींना आज काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. नोकरदार वरिष्ठांच्या दडपणात असतील. दुकानदार उधारी वसूल करतील.
शुभम भवतु!
-जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424