मावळ ऑनलाईन –लोणावळा शहरातील नांगरगाव भागात (Lonavala)घरफोडी करून जबरदस्तीने अतिक्रमण करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी तेजस्विनी विनय वेदक (वय 67, रा. श्री गार्डन सोसायटीजवळ, नांगरगाव, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी चरण सुरेश इंगुळकर (रा. बलवण, ता. मावळ, जि. पुणे) व त्याचे दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे घर (क्र. २८२, श्री गार्डन सोसायटीजवळ, नांगरगाव) येथे आरोपी चरण इंगुळकर व इतर दोघेजण बेकायदेशीरपणे घुसले. आरोपींनी घराचे तीन ठिकाणचे कुलूप तोडून वरील मजल्याचा ताबा घेत अतिक्रमण केले. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे पती घरी परतल्यावर त्यांनी हा प्रकार पाहिला. विचारणा केली असता आरोपी इंगुळकर याने, “हा मजला मी सुधाकर महागावकर याच्याकडून खरेदी केला आहे” असा दावा केला.
Sunil Shelke: मावळातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
Pune : ऑनलाईन लोनचे आमिष दाखवून तब्बल 19.57 लाखांची फसवणूक
याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.