मावळ ऑनलाईन – मौजे वेहेरगाव, कार्ला (ता. मावळ) येथील प्रसिद्ध श्री एकविरा देवी ( Shri Ekvira Devi) नवरात्र उत्सव 2025 दरम्यान (दि. 22 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर) भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 115 तसेच शासनाच्या अधिसूचनेन्वये हा आदेश जारी केला आहे.
PMPML : श्रीक्षेत्र देहू ते भंडारा डोंगर भाविकांसाठी पीएमपीएमएलची नवी सेवेला सुरुवात
वाहतुकीवरील निर्बंध
22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी मंदिर ( Shri Ekvira Devi)पायथा या मार्गावर अवजड व मोठ्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.
27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 रोजी दररोज सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जुना मुंबई–पुणे महामार्ग व पुणे–मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका, लोणावळा ते वडगाव फाटा (वडगाव मावळ) या दरम्यान अवजड वाहनांना प्रवेश बंदी ( Shri Ekvira Devi)राहील.
Changes in traffic : कोंढवा येथे हाफ मॅरेथॉनमुळे 21 सप्टेंबर रोजी वाहतुकीत बदल लागू
पर्यायी मार्ग
जुना मुंबई–पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड वाहने कुसगाव बुद्रुक टोलनाका, लोणावळा मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाका मार्गे पुण्याकडे वळविण्यात ( Shri Ekvira Devi) येतील.
पुणे–मुंबईकडे जाणारी जड वाहने वडगाव, तळेगाव फाटा ( Shri Ekvira Devi)मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळविली जातील.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, नवरात्र उत्सव काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार असल्याने अपघात व वाहतूक कोंडी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांचे पालन करून सहकार्य करावे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी ( Shri Ekvira Devi) हे बदल आवश्यक असल्याचे प्रशासनाचे स्पष्ट मत आहे.