मावळ ऑनलाईन – आगामी सण-उत्सव तसेच (Vadgaon Maval) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची व विश्वासाची भावना दृढ व्हावी यासाठी वडगाव मावळ पोलिसांच्या वतीने बुधवारी (दि. 17 सप्टेंबर) शहरात संयुक्त रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील महत्वाच्या ठिकाणांवरून काढण्यात आला. यात तहसील कार्यालय, पंचायत समिती चौक, न्यायालय, पोटोबा मंदिर, जामा मस्जिद, चावडी चौक आदी भागांचा समावेश होता. या मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश पोहोचवण्यात आला.
स्थानिक पोलीस दल आणि केंद्रीय सशस्त्र दल यांना परिसराची ओळख होण्यासाठी आणि भविष्यातील कारवाईच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा घेण्यात आला. रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) सी/102 बटालियन नवी मुंबई आणि वडगाव मावळ पोलिसांनी संयुक्तपणे हा रूट मार्च पार पाडला.

या मोहिमेत वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे तीन अधिकारी, आरएएफचे दोन अधिकारी तसेच 50 सशस्त्र जवान सहभागी झाले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.
Mangrul: मंगरूळ येथे अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमाचे उत्साहात आयोजन
Pimpri Chinchwad Crime News 19 September 2025: हॉटेल चालवण्यासाठी मागितली खंडणी, एकास अटक
या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून, येणाऱ्या सण-उत्सव आणि निवडणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.