२२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान व्याख्यानांचे आयोजन
मावळकरांना मिळणार वैचारिक मेजवानी
मावळ ऑनलाईन –वडगाव येथील मावळ विचार मंचाने दरवर्षीप्रमाणे ( Maval Vichar Manch) नवरात्रीनिमित्त सरस्वती व्याख्यानमाला आयोजित केली आहे.श्री पोटोबा महाराज देवस्थान यांच्या सहकार्याने मंदिराच्या प्रांगणात दि २२ सप्टेंबर ते दि १ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६:३० वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेचे यंदा २५ वे वर्ष आहे. व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथ दिंडी, दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान,आरोग्य शिबीर आणि इतर स्पर्धा होणार असल्याची माहिती मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, यावर्षीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी दिली.
व्याख्यानमालेत सिने अभिनेते सुबोध भावे, सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड, शिव व्याख्याते नितीन बानगुडे पाटील, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे अशा अनेक मातब्बर वक्त्यांना ऐकण्याची संधी मावळकरांना मिळणार आहे.
▪️वार, दिनांक,व्याख्याता व विषय, कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे खालील प्रमाणे
सोमवारी (दि २२) सिने अभिनेते सुबोध भावे (कलाकार आणि त्यांची सामाजिक बांधिलकी), माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, उद्योजक रामदास काकडे व नंदकुमार शेलार ( Maval Vichar Manch)
दि २३ रोजी शिव व्याख्याते नितीन बानगुडे पाटील (श्री छत्रपती शिवराय),श्री पोटोबा देवस्थान उपाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी व बबनराव भोंगाडे
दि २५ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल आयपीएस(युवकांनो पुढे या), प्रांत अधिकारी मावळ मुळशी सुरेंद्र नवले,तहसीलदार विक्रम देशमुख व कायदे तज्ञ ॲड केशव मगर.
दि २४ रोजी लष्कर अधिकारी मोहिनी गर्गे(कुलकर्णी) (ताराराणी ते झाशीची राणी, युद्धभूमीवर रणरागिणी), निवडणूक प्रमुख भाजपा मावळ रवींद्र भेगडे, निर्मल वारीचे संतोष दाभाडे पाटील व बंडू फाटक
दि २६ रोजी लेखक डॉ.सुनील धनगर (युवकांसमोरील आव्हाने), ( Maval Vichar Manch)
सहकार महर्षी ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे, सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असो. सुनील मुथा व माजी सभापती एकनाथ टिळे.
दि२७ रोजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (महाराष्ट्राचे शासन काल, आज व उद्या), खासदार श्रीरंग बारणे, उद्योजक बाबासाहेब औटी व संकेत विरकर.
दि २८ रोजी आध्यात्मिक गुरू चंद्रकांत निंबाळकर (सुखी जीवनाची गुरुकिल्ली), माजी सभापती कृषी व पशुसंवर्धन जि प बाबुराव वायकर, माजी सरपंच प्रशांत भागवत व सहाय्यक वनरक्षक प्रदीप संकपाळ.
दि २९ रोजी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड (जीवन सुंदर आहे), मा अध्यक्ष उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ उल्हास दादा पवार, मा सरपंच श्रीकृष्ण बराटे व दिलीप सोनिगरा. ( Maval Vichar Manch)
Ola-Uber : ओला-उबर प्रवास महागणार: प्रति किमी २२.७२ रुपये दर, गर्दीच्या वेळेत १.५ पट वाढ शक्य
दि ३० रोजी शिर्डी संस्थांनचे माजी अध्यक्ष विद्याधर ताठे (भारतीय स्त्री संत परंपरा), मा सभापती निवृत्ती शेटे, मा नगराध्यक्ष ॲड रवींद्र दाभाडे व समर्थ फाउंडेशनचे किरण इनामदार
दि १ ऑक्टोबर रोजी कवी प्रशांत मोरे, प्रशांत केंदळे व मृणाल जैन (कवी संमेलन), आमदार सुनील शेळके, खासदार निलेश लंके व माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, ( Maval Vichar Manch)
वरील मान्यवर व्याख्याते, कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
व्याख्यानमालेत दररोज विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यात अनुक्रमे ऑलिंपिक वीर मारुती आडकर, क्रीडा प्रशिक्षक सुधीर म्हाळसकर, व्याख्याते विवेक गुरव, शिवशंकर स्वामी, रोहिदास लखिमले, ॲड शंकरराव ढोरे, उद्योजक विलास काळोखे, अमोल पोफळे, सविता सुराणा यांचा समावेश आहे.
अजित देशपांडे,ॲड दामोदर भंडारी, धनश्री भोंडवे,आरती राऊत,गिरीश गुजराणी, संतोष भालेराव,अतुल म्हाळसकर आदींनी संयोजन केले ( Maval Vichar Manch) आहे.