मावळ ऑनलाईन – बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या ( Narendra Modi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या पत्रातून दिल्या.
एकूण 287 विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत या भाषेतून माननीय पंतप्रधान यांना शुभेच्छा पत्र लिहिले सर्व शुभेच्छा पत्र पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आले. त्याचप्रमाणे शासन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात ( Narendra Modi)आल्या.
संस्था अध्यक्ष सुरेश झेंडे, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांच्या शुभेच्छा पत्र लेखनच्या कल्पनेतून मुख्याध्यापिकारेखा परदेशी यांनी कार्यवाही केली. त्यास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ( Narendra Modi) यांनी सहकार्य केले.



















