मावळ ऑनलाईन –शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलात (Maval)पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे, जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर पिंपरी-चिंचवड आणि मावळ जिल्हा समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
याशिवाय सौ. शिलाताई भोंडवे यांची जिल्हा महिला संघटिका म्हणून, तर राम सावंत यांची मावळ तालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. नव्या जबाबदाऱ्यांच्या निमित्ताने पक्ष संघटना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शुभेच्छा दिल्या. “शिवसेनेच्या विचारांना बळकटी देत, स्थानिक पातळीवर जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्याचे काम नव्या टीमकडून होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Pune: पंडित रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार
Talegaon Dabhade: सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे- रामदास काकडे
या संघटनात्मक फेरबदलामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यातील शिवसेनेची ताकद अधिक वाढून पक्षाची कामगिरी गतीमान होईल, असे मानले जात आहे.