situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

Published On:

मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड(Vadgaon Maval) झाली. मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील अनेकांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) कमळ हाती घेतले.

कमळ हाच विजयाचा मार्ग असे म्हणत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. दरम्यान तालुक्यातील ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. मात्र सोमवारी पक्ष प्रवेशावेळी ते हजर नसल्याने त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. या पक्ष प्रवेशाचा आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय जनता पक्षात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला. यामुळे तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. यावेळी मावळचे माजी मंत्री बाळा भेगडे, तसेच महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, तालुक्यातील मंडल अध्यक्ष यांच्यासह मावळ तालुक्यातील पदाधिकारी,असंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.

Pune: पंडित रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार

Talegaon Dabhade: सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे- रामदास काकडे

प्रवेश करणारे प्रमुख नेते

उद्योजक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, सुभाष जाधव,सचिन घोटकुले, संतोष मु-हे, शिवाजी असवले, अतिष परदेशी, संग्राम काकडे, तुषार भेगडे, अरुण माने, अरुण चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला या वेळी कार्यकर्त्यांनी “कमळ हाच विजयाचा मार्ग” अशा घोषणा देत भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. पक्षनेत्यांनी सर्वांचे स्वागत करताना, “आगामी निवडणुकांत भाजपची ताकद मावळ तालुक्यात आणखी वाढणार” असा विश्वास व्यक्त केला. या मोठ्या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बापूसाहेब भेगडेंचा प्रवेश लवकरच

बाहेरगावी असल्याने बापूसाहेब भेगडे यांचा आजच्या सोहळ्यात सहभाग झाला नाही. मात्र त्यांचे समर्थक भाजपमध्ये दाखल झाले असून लवकरच भेगडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगितले आहे. असे असले तरीही बापूसाहेब भेगडे यांचा पक्षप्रवेश अजूनही गुलदस्त्यातच आहे.

Follow Us On