मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- महिना: भाद्रपद कृष्ण पक्ष तिथी नवमी. शके १९४७. वार – सोमवार. तारीख १५.०९.२०२५ (Rashi Bhavishya 15 Sept 2025)
शुभाशुभ विचार – व्यतिपात वर्ज्य.
आज विशेष- नवमी श्राद्ध. अविधवा नवमी.
राहू काळ – सकाळी ०७.३० ते ९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- मृग ७.३२ पर्यंत नंतर आर्द्रा. चंद्र राशी – मिथुन.
मेष – ( शुभ रंग – निळा) Rashi Bhavishya 15 Sept 2025
आज तुम्हाला काही महत्त्वाच्या बातम्या येतील. काही कामासाठी शेजाऱ्यांची मदत होईल. गायक कलाकारांना आज रसिकांकडून उदंड प्रतिसाद मिळेल. नवोदित लेखकांना वाचक वर्ग मिळेल.
वृषभ ( शुभ रंग- क्रीम)
आज घरात काही प्रिय पाहुण्यांचे आगमन होईल. आज कुणालाही सल्ले देण्याचा मोह आवरा. अतिस्पष्टवक्तेपणामुळे काही जणांची मने दुखावतील.
मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)
स्वराशीतून चंद्रभ्रमण होत असताना तुमचे मन काहीसे हळवे असेल. आज महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. थोरामोठ्यांचे सल्ले जरूर घ्या.
कर्क – ( शुभ रंग – चंदेरी)
कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमाखर्चाची गणिते बिघडणार आहेत. कायदा मोडण्याचे धाडस अजिबात करू नका. आज आपल्या मर्यादेत राहणे हिताचे आहे.
Vadgaon Maval: मावळ तालुक्यातील बापूसाहेब भेगडे समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश
सिंह -( शुभ रंग – डाळिंबी) Rashi Bhavishya 15 Sept 2025
आज तुमच्या राशीच्या लाभात असलेला चंद्र काहीतरी अनपेक्षित लाभ देणार आहे. आज तुम्ही योग्य निर्णय घ्याल व वेळेचे योग्य नियोजन कराल.
कन्या – ( शुभ रंग- भगवा)
नोकरदारांना जास्त वेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील. वरिष्ठ आज जेवढे विचारतील तेवढेच बोला. आज कौटुंबिक कामांकडे तुमचे दुर्लक्ष होईल.
तूळ ( शुभ रंग- भगवा)
आज तुमचा आध्यात्मिक गोष्टींकडे कल असेल. एखाद्या गुरुसमान व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल. उच्चशिक्षित असणाऱ्यांना आज विदेश गमनाच्या संधी खुणावतील.
वृश्चिक ( शुभ रंग – मोरपंखी)
आज मोठ्या आर्थिक उलाढाली टाळा. चुकीच्या घेतलेल्या निर्णयातून एखादे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गैरवर्तनाने प्रतिष्ठेला धोका संभवतो.
Pimpri-Chinchwad: आसमंती भिनला, दाही दिशा घुमला… ‘शंभुराजे शंभुराजे’ जयघोष!
धनु (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 15 Sept 2025
कार्यक्षेत्रात विरोधकांना गोड बोलून आपले म्हणणे पटवता येईल. आज अति आक्रमकता टाळायला हवी. घरात जोडीदाराशी ही सुसंवाद गरजेचा आहे.
मकर (शुभ रंग- जांभळा)
मामा मावशी कडून काही महत्त्वाचे समाचार येतील. येणी वसूल होतील. नोकरदारांवर कामाचा ताण खूपच वाढणार आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आज काही जुन्या मित्रांसह गेट-टुगेदर कराल. बरेच दिवसापासून प्रतीक्षेत असलेली प्रिय व्यक्ती आज संपर्कात येईल.
मीन ( शुभ रंग- पिस्ता)
बांधकामाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. आज तुम्हाला मातोश्रींकडून एखादा लाभ संभवतो. विद्यार्थी कौतुकास्पद कामगिरी करतील.
शुभम भवतु!
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424