मावळ ऑनलाईन –सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षकांनी सर्व गुणसंपन्न विद्यार्थी (Talegaon Dabhade)तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावी असे प्रतिपादन उद्योजक इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व मावळ तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे होते.
याप्रसंगी पुणे जिल्हा पायाभूत शिक्षण व साक्षरता संचालक वसंत माळुंजकर,पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विराज खराटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह राजेश गायकवाड, रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे,अध्यक्ष भगवान शिंदे, सोनबा गोपाळे गुरुजी,संदीप पानसरे, प्राचार्य डॉ संभाजी मलघे, सुरेश दाभाडे, संजय मेहता, भालचंद्र लेले, दिलीप पारेख, सुरेश शेंडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, विकास तारे तसेच रोटरी सिटीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काकडे पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि ज्ञान येत असून यासाठी सक्षम विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांना पार पाडावी लागेल असेही काकडे यांनी सांगितले.
शिक्षकांनी शिक्षणातील बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे घडविण्याचा प्रयत्न करावा असे मत पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विराज खराटे यांनी व्यक्त केले.
मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यासाठी रोटरी सिटीच्या माध्यमातून आपण शैक्षणिक प्रोजेक्ट घेणार असल्याचे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना रोटरीच्या विविधांगी उपक्रमांची माहिती विशद केली. रोटरीच्या बदलत्या धोरणानुसार विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती विशद करताना प्रत्येक क्लबने समाजोपयोगी उपक्रम घेताना रोटरी फाउंडेशनला देखील मदत करावी म्हणजे भविष्यात ग्लोबल ग्रँडमधून मोठे प्रोजेक्ट समाज हितासाठी राबवता येतील असे प्रतिपादन वसंतराव माळुंजकर यांनी करताना डिस्ट्रिक्टच्या विविध योजनांची माहिती दिली
यावेळी वसंतराव माळुंजकर, सोनबा गोपाळे गुरुजी, भगवानराव शिंदे, राजेश गायकवाड,सुरेश दाभाडे आदीनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कल्याणी कडेकर, अश्विनी पाटील, मंगल आहेर, बोरसे मॅडम, उमेश इंगुळकर यांनी मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहिले.
Pimpri-Chinchwad: आसमंती भिनला, दाही दिशा घुमला… ‘शंभुराजे शंभुराजे’ जयघोष!
Vadgaon Maval: मावळ तालुक्यातील बापूसाहेब भेगडे समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश
कार्यक्रमाचे स्वागत दिपाली पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुकुंद तनपुरे यांनी केले. तर सूत्रसंचालन राजेश बारणे यांनी केले. दशरथ ढमढेरे यांनी आभार मानले.
संग्राम जगताप,निलेश राक्षे, आनंदराव रिकामे, तानाजी मराठे,स्वाती मुठे,मनिषा पारखे, वैशाली लगाडे, वर्षा खारगे, कमल ढमढेरे,दिनेश निळकंठ,संजय भागवत, मोहन खांबेटे, रघुनाथ कश्यप, विश्वास कदम इ.सह रोटरी सिटी चे पदाधिकारी व मेंबर्स मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व मेंबर्स यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मावळ तालुक्यातील विविध भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ही कार्यशाळा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतील यशोदा महादेव काकडे सभागृहात संपन्न झाली.