मावळ ऑनलाईन –विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट संचलित (Lonavala) ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल मधील केसीएसए (KCSA) मध्ये राष्ट्रीय विज्ञान चॅलेंज दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन डीआरडीओ, पुणे येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हिमांशू शेखर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पुष्पेंदु रक्षित, कार्यक्रम संचालक केसीएसए तसेच इक़बाल डी., झफ्फार खान, प्रमोद ए., चिन्मय जे., आकांक्षा एस., डॉ. शैलेंद्र एस., राहुल ए., दत्तात्रय जी. आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. हिमांशू शेखर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अवकाश शिक्षण व संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. गणित व विज्ञानातील मूळ संकल्पना नीट समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचे प्रोत्साहन दिले.
Shrirang Barne: खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत देहूरोड येथे चौक व रस्त्याचा नामकरण सोहळा संपन्न
Pimpri Chinchwad Crime News 14September 2025: भोसरीमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून मुळे 21 वर्षीय तरुणाची हत्या; गर्लफ्रेंडने दाखल केली तक्रार, आरोपीला अटक


या स्पर्धेत १४ संघांतील ४५ विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे लाईव्ह मॉडेल्स, कार्यरत प्रकल्प आणि विज्ञान-तंत्रज्ञान व अवकाशविज्ञानाशी संबंधित सादरीकरणे मांडली. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास ४०० हून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध प्रकल्पेही या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी दोन महत्त्वपूर्ण कार्यशाळा घेण्यात आल्या. पुणे येथील डॉ. अमित आंद्रे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स या विषयावर कार्यशाळा घेतली, तर सांगलीचे शुभम यादव यांनी स्पेस सायन्स एज्युकेशन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळांना ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही सत्रे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त ठरली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड माधव भोंडे, उपाध्यक्ष, नारायण भार्गव, सचिव राधिका भोंडे, केसीएसएच्या विश्वस्त मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक व प्राचार्यांनीही सहकार्य केले.