मावळ ऑनलाईन – सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान कडून(Mangalmurti Award) दि १४ रोजी हॉटेल इशा येथे आयोजित करण्यात आलेला मंगलमूर्ती अवॉर्ड हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील यांनी दिली.
सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान मावळ आयोजित गणेशोत्सवामध्ये उत्कृष्ट सजावट तसेच शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी मंगलमूर्ती अवॉर्ड प्रदान करण्याचा कार्यक्रम हॉटेल ईशा येथे रविवार दि १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार होता. याच वेळी भारत – पाकिस्तान यांचा क्रिकेट सामना आहे.
Talegaon Dabhade: नगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय सुरू;गोल्डन रोटरीचा अभिनव उपक्रम
Pune Crime News : वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन जण अटकेत


त्यासंदर्भात गणेश मंडळातील कार्यकर्त्यानी केलेल्या सुचनेनुसार सदर मंगलमूर्ती अवॉर्ड प्रदान कार्यक्रम त्याच ठिकाणी त्याच वेळेस रविवारी दि.२१ रोजी होणार आहे. तरी संबंधीत गणेश मंडळाचे सभासद,प्रतिष्ठानचे सभासद यांनी सहकार्य करावे.असे आवाहन दाभाडे यांनी यावेळी केले आहे.
