मावळ ऑनलाईन – डॉ.डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे ( Envision 2K25) या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी “Envision 2K25” इंडक्शन कार्यक्रमाचे भव्य उदघाटन(दि ११) मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निलेश उके, अध्यक्ष – अभ्यास मंडळ (कॉम्प्युटर इंजिनीअरिंग), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विशेष अतिथी म्हणून ऋषिकेश धांडे(माजी प्रादेशिक प्रमुख टीसीएस अकॅडमिक अलायन्स) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती( Envision 2K25) पूजन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाचा शुभारंभ आध्यात्मिकतेने झाला. तसेच महाविद्यालयाचा दृष्टीकोन, उद्दिष्टे आणि यशोमालिका दर्शवणारी ध्वनिचित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी. शिरबहादूरकर यांनी प्रास्ताविक भाषणातून ( Envision 2K25)विद्यार्थ्यांना शिक्षण हे एका परिपूर्ण भविष्याचा पाया आहे. जे तुम्हाला ज्ञान,समीक्षात्मक विचार कौशल्ये आणि तुमचा स्वतःचा मार्ग घडवण्याची शक्ती देते. विद्यार्थी हे प्रतिभावान असतात,त्यांना परिपूर्ण बनविणे आणि समाजाचे जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य महाविद्यालयामार्फत होत असते. शैक्षणिक संस्थेची भूमिका केवळ शिक्षण देणे नाही, तर त्या विद्यार्थ्यांना जीवनातील उत्तम गुणांनी घडवणे देखील आहे.असे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. निलेश उके यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेचे महत्त्व, जिद्द व चिकाटी प्रामाणिकपणाचे आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. ( Envision 2K25) या कार्यक्रमात CSI (Computer Society of India) संस्थेच्या सदस्यत्व प्रमाणपत्राचे देखील या कार्यक्रमानिमित्त अनावरण करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक व औद्योगिक उपक्रमांचे नवीन दार खुले झाले आहे.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून लाभलेले ऋषिकेश धांडे यांनी विद्यार्थ्यांना वाचन, डिजिटल वेलनेस व LinkedIn प्रोफाईल बिल्डिंग या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या Student Developer Club Website चे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, जे विद्यार्थ्यांच्या नवनवीन आणि सर्जनशीलतेला एक व्यासपीठ प्रदान करेल.कार्यक्रमात सांस्कृतिक व मनोरंजनात्मक रंग भरत नुकताच नवीन प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट “आरपार” या चित्रपटाचे प्रमुख कलाकार म्हणून ह्रुता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर या कलाकारांच्या उपस्थिती मध्ये चित्रपटाचे प्रमोशन व काही संवाद विद्यार्थ्यांच्या समोर सादर करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.या प्रसंगी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला .
यानंतर डॉ.डी.वाय. पाटील शटेक्निकल कॅम्पस, वराळे या महाविद्यालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड अनुजा सुशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन ( Envision 2K25) केले.
प्रा. रश्मी धरसे व प्रा.अनुराधा बोबडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाची सांगता “पसायदान” ने करण्यात आली,या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड अनुजा सुशांत पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यासोबतच प्राचार्य डॉ. शिरबहादूरकर, डीन अकॅडमिक्स डॉ. योगेश गुरव, रजिस्ट्रार नामदेव वेताळे, डॉ गोलगिरे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे ( Envision 2K25) सहकार्य लाभले.