मावळ ऑनलाईन – आईच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ ( Srujan Foundation) शकत नाही. यासाठी आपण सर्व आई या ईश्वरी शक्तीपुढे सदैव नतमस्तक असतो असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, युवा कीर्तनकारप सचिन महाराज पवार यांनी श्री क्षेत्र देहू येथे केले. श्री क्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशन व कंद परिवार यांच्यावतीने वै. मंजुळाबाई बाळासाहेब कंद यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आई’ सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने हभप सचिन महाराज पवार बोलत होते.
Statue of Hindubhushan : ‘स्टच्यू ऑफ हिंदुभूषण’ ला ऐतिहासिक गगनभेदी मानवंदना
श्रीक्षेत्र देहूतील श्रीमती हौसाबाई सहादू काळोखे, श्रीमती हिराबाई विष्णू ( Srujan Foundation) काळोखे, सौ. धोंडाबाई कृष्णा परंडवाल, सौ. आशाताई श्रीकांत मोरे, श्रीमती सिंधुबाई चिंतामण पचपिंड व सौ. अनिताताई सुरेश हगवणे या आदर्श मातांच्या कार्याचा गौरव करीत आदर्श माता श्रीमती शांताबाई मोहन काकडे, समाजसेविका डॉ. शिल्पाताई मापुस्कर नारायणन्, अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, धर्माचार्य हभप शंकर महाराज शेवाळे, संत साहित्याचे अभ्यासक हभप सचिन महाराज पवार यांच्या शुभहस्ते गाथा, शाल, मानाची साडी व सन्मानपत्र प्रदान करून ‘आई’ सन्मानाने या मातांना सन्मानित करण्यात आले.

यानिमित्ताने धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांची प्रवचन सेवा ( Srujan Foundation) संपन्न झाली. या आई सन्मान सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटे, गोडूम्ब्रे येथील वि.वि. कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय सावंत, माजी सरपंच अशोकराव मोरे, माजी चेअरमन अभिमन्यू काळोखे, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार संजय भसे, कामगार नेते मच्छिंद्र हगवणे, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मातृशक्तीविषयी अंत:करणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा व आईविषयी आपल्या हृदय कोंदणात असलेल्या अनंत आठवणींना उजाळा देणाऱ्या या वात्सल्याच्या भावपूर्ण सोहळ्याचे साक्षीदार म्हणून कंद परिवारचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक व मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक केले. सौ. वृषाली आढाव यांनी आपल्या सुमधुर, रसाळ वाणीने सर्व सन्मानपत्राचे वाचन केले. सौरभ कंद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर मानसी कंद यांनी सर्व उपस्थितांचे आभार ( Srujan Foundation) व्यक्त केले.