मावळ ऑनलाईन – कामशेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत ( Kamshet Crime News) एका तरुणाला गांजा व मोबाईलसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) पहाटे कामशेत-पवनानगर रस्त्यावर, चिखलसेकडे जाणाऱ्या मार्गावर करण्यात आली.
Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात : चहा विक्रेत्या तरुणाचा जागीच मृत्यू
याबाबत पोलीस हवालदार तुषार भोईटे (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांनी ( Kamshet Crime News) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नीतेश ऊर्फ मनोज महेंद्र भन्साळी (वय 27, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) हा संशयित 1 हजार 800 ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत सुमारे 27 हजार रुपये) व विवो कंपनीचा मोबाइल फोन (किंमत सुमारे 10 हजार रुपये) असा मिळून एकूण 37 हजार रुपयांचा मुद्देमाल बेकायदा ताब्यात बाळगताना आढळून आला.
Ashtavinayaka : श्रीक्षेत्र अष्टविनायक मंदिर विकास आराखड्यात हेरिटेजचा सन्मान – अजित पवार
कामशेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करून भन्साळीला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मन:प्रभावी पदार्थ (NDPS Act) बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या ( Kamshet Crime News) मार्गदर्शनाखाली हवालदार लोसरवार करीत आहेत.