मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – कृष्णपक्ष. तिथी – ०५. शके १९४७. वार – शुक्रवार. तारीख – १२.०९.२०२५ (Rashi Bhavishya 12 Sept 2025).
शुभाशुभ विचार – १२ प.चांगला दिवस.
आज विशेष – षष्ठी श्राद्ध.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – भरणी ११.५९ पर्यंत नंतर कृत्तिका. चंद्र राशी – मेष १७.३९ पर्यंत नंतर वृषभ.
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 12 Sept 2025
मनाच्या लहरीपणस आवर घालणे गरजेचे आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागा. आपलेच खरे करण्याचा अट्टाहास नको.
वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज काही दूरचे नातलग संपर्कात येतील. देणी-घेणी लिखित स्वरूपात असूद्यात. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यायला हवी. अनावश्यक खर्चावर ताबा असावा.
मिथुन (शुभ रंग – निळा)
राशीच्या लाभातील चंद्र आज हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश देईल. काही मंदावलेले व्यवसाय गती घेतील. दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.
कर्क ( शुभ रंग- लाल)
नोकरदारांच्या कामावरील निष्ठेची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. रिकाम्या गप्पा टाळून आज फक्त कृतीला प्राधान्य दिल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी यशदायी आहे.
Vadgaon Maval Court : वडगाव मावळ न्यायालयासाठी १०९ कोटी…
सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 12 Sept 2025
आज महत्त्वाच्या कामात काही अनपेक्षित अडचणी येतील. ज्येष्ठ मंडळी पूजा पाठात रमतील. वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करा. मोठ्यांच्या वयाच्या मान राखा.
कन्या (शुभ रंग- आकाशी)
राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण चालू आहे. कोणतीही धाडसाची कामे आज टाळावीत. वाहन चालवताना काळजी घ्या. शेअर्स मार्केट पासून लांब राहा.
तूळ (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमच्यासाठी आनंदी व उत्साही दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. एखादे सरप्राईज गिफ्ट देऊन तुम्ही आपल्या जोडीदाराचे मन जिंकाल.
वृश्चिक ( शुभ रंग- हिरवा)
नोकरदारांवर कामाचा ताण वाढलेला असेल. आज तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. क्षुल्लक दुखणे ही अंगावर काढू नका. आज बेरोजगारांना रोजगार मिळेल.
Diveghat : दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणामुळे शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाहतूक बंद
धनु (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 12 Sept 2025
बऱ्याच दिवसानंतर एखाद्या प्रिय व्यक्तीचा अनपेक्षित फोन येईल. तरुण मंडळी पावसाळी सहलीचे बेत आखतील. येणी असतील तर मागायला लाजू नका.
मकर (शुभ रंग- भगवा)
कलाकारांना कामासाठी भटकंती करावी लागेल. खेळाडूंना सराव वाढवावा लागणार आहे. गृहिणींना घरातील मोठ्यांचे मानपान जपावे लागतील.
कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेरच राहाल. काहींना किरकोळ घर दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागतील. तुमची काही गुपिते उघड होतील. आज कमीच बोला.
मीन ( शुभ रंग – गुलाबी)
आज तुम्ही आनंदी व सकारात्मक असाल. रुटीन कामातून थोडा मौजमजेसाठी वेळ काढाल. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊन मुलांचेही लाड पुरवाल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424