सारिकाताई सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी
मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील युवा नेतृत्व प्रशांत दादा भागवत ( Prashant Bhagwat) यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. ७ सप्टेंबर) रोजी जांभुळफाटा येथील शिवराज पॅलेस येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा सोहळा पार पडला. यावेळी महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणाात होती.
आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी, कुस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. यात गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना हेलिकॉप्टर राईड, गोल्ड प्लेटेड गणेश मूर्ती, स्मार्टफोन, फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, फूड प्रोसेसर, गॅस शेगडी, कुलर, मिक्सर, टेबल फॅन व इस्त्री अशी विविध आकर्षक बक्षिसे स्पर्धकांना देण्यात ( Prashant Bhagwat) आली.
Adkar Foundation : ॲड. आव्हाडांप्रमाणे ज्ञानाधारित प्रकाशवाटेची गरज- भारत सासणे
यावेळी कुलस्वामिनी महिला मंच मावळ तालुका संस्थापिका अध्यक्षा सारिका ताई सुनील आण्णा शेळके यांसह राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा वर्षा नवघणे, विविध गावांतील सरपंच-माजी सरपंच, महिला नेत्या व मान्यवरांची ( Prashant Bhagwat) मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आरजे अक्षयच्या धमाल सूत्रसंचालनाने कार्यक्रमात जोश निर्माण झाला. लहान मुलांनी व महिलांनी दिलेल्या नृत्य सादरीकरणाने वातावरण भारावले.



Kalapini : सुगम संगीत स्पर्धेच्या स्पर्धकांसाठी कार्यशाळा संपन्न
यावेळी महिलांनी गणरायाला प्रार्थना केली की “प्रशांत दादा भागवत यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत.” यावेळी प्रशांत भागवत यांच्या कार्याला देखील उजाळा ( Prashant Bhagwat) देण्यात आला.
कार्यक्रमात स्पर्धकांना मिळालेले बक्षिसे पुढील प्रमाणे ; ( क्रमांक – सजावट – गावाचे नाव – बक्षिस)
- विद्या अरूण काशिद – पहिला (अ) – ज्ञानेश्वर महाराज – इंदोरी – फ्रीज
- श्लोक महिंद्र वाळुंज – पहिला (ब) – ऑपरेशन सिंदूर – इंदोरी – फ्रीज
- अनिकेत आत्माराम शिंदे – दुसरा (अ) – वारी दिवे घाट – राजपुरी – पिठाची गिरणी
- विद्या विकास दगडे दुसरा (ब) वाप्पाची शाळा इंदोरी पिठाची गिरणी
- नंदा वाळासाहेब झोळ तिसरा (अ) वटसावित्री वराळे वॉशिंग मशीन
- युगांधर प्रविण वारिंगे तिसरा (ब) शिवालय वारंगवाडी वॉशिंग मशीन
- संदेश सिताराम शिंदे चौथा (अ) जेजुरी ब्राम्हणवाडी फूड प्रोसेसर
- गितल नितीन कारके चौथा (व) पंढरपूर दर्शन आंवी फूड प्रोसेसर
- हर्षदा/श्रद्धा/काजल उडापे पाचवा (अ) कोळी वधलवाडी स्मार्ट फोन
- मिनल हरिओम आगळमे पाचवा (ब) स्वयंपाक घर साते स्मार्ट फोन
- हर्षवर्धन आकाश नाटक सहावा (अ) केदारनाथ जांबवडे गॅस शेगडी
- मयुर अरूण शिंदे सहावा (ब) इंदोरी गाव इंदोरी गॅस शेगडी
- शंकर तानाजी मोहिते सातवा (अ) नवनाथ सेवेकरी मोहितेवाडी कुलर
- काजल अनिल पाटील सातवा (ब) स्वामी समर्थ सुदवडी कुलर
- प्रतिक्षा महेश आल्हाट आठवा (अ) पाईवारी माळवाडी मिक्सर
- योगिता संदिप काळे आठवा (ब) तुळजाभवानी प्रवेशव्दार नाणोली मिक्सर
- मयुरी मारुती उडापे नववा (अ) तुकाराम महाराज पालखी बधलवाडी टेबल फॅन
- किरण योगेश मराठे नववा (ब) राजा पंठरीचा वराळे टेबल फॅन
- विशाखा संकेत तोडकर दहावा (अ) तुळजाभवानी सांगवी इस्त्री
- मोनिका जांभुळकर दहावा (ब) प्रवेशव्दार जांभुळ इस्त्री
- प्रमिला संजय गाडे दहावा (क) पाईवारी
यासह आयोजकांकडून दोन विशेष बक्षिसे देण्यात आली.यामध्ये शैला अनुराग मराठे यांनी प्रशांत दादा भागवत यांच्या मार्फत महिलांसाठी हेलिकॉप्टर राईड आयोजित करण्यात आली होती,त्याचा विशेष देखावा बनविला होता. त्याबद्दल शैला अनुराग मराठे यांना विशेष उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले गोल्ड प्लेटेड गणेश मूर्ती त्यांना भेट म्हणून देण्यात आली. यासह आणखीन एक उत्तेजनार्थ बक्षीस प्रेरणा रवींद्र वाघ यांना देण्यात आले. देखाव्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक व्ह्यूज मिळाल्याबद्दल प्रेरणा वाघ यांना गौरविण्यात आले. त्यांच्या देखाव्याच्या व्हिडिओला इंस्टाग्राम वर 25 हजार 500 व्ह्यूज आणि 1000 लाईक मिळाले.
याप्रसंगी इंदोरी गाव लोकनियुक्त सरपंच शशिकांत शिंदे, माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, विठ्ठल मोहिते, अनिल मोहिते, माळवाडी विद्यमान सरपंच पल्लवी दाभाडे, ( Prashant Bhagwat)बेबीताई बैकर, ग्रामीण ब्लॉक माजी अध्यक्षा पुष्पाताई घोजगे, जयश्री सावंत (ग्रा. सदस्य), अलकाताई शिंदे, मंदा ढोरे, माजी उपसरपंच सोनलताई सूर्यवंशी, रा. कॅा. अध्यक्षा इंदोरी राजश्री राऊत, माधुरी गाडे (रा. कॅा. अध्यक्षा सुदुंबरे), छाया सावंत (रा. कॅा. अध्यक्षा गोडुंब्रे), नेहा बधाले (रा. कॅा. अध्यक्षा बधलवाडी ), दीपिका भेगडे, साधना उडापे, उपसरपंच आम्रपाली मोरे, पल्लवी मराठे, रा. कॅा. उपअध्यक्षा मनीषा दाभाडे,
पुनम शिंदे (रा. कॅा. अध्यक्षा राजापुरी), तृप्ती जांभूळकर, जयश्री लंके, प्रियांका चव्हाण, सीताबाई वाघमारे, धनश्री काशिद (ग्रा. सदस्य), अंकिता ढोरे (रा. कॅा. उपअध्यक्षा इंदोरी), अक्षदा शिंदे (रा. कॅा. युवती अध्यक्षा इंदोरी), मा. उपसरपंच विद्या मोहिते, रा. कॅा. अध्यक्षा वराळे अनिता मराठे, रा. कॅा. अध्यक्षा मिंडेवाडी सुवर्णा बधाले, रा. कॅा. अध्यक्षा नाणोली संगीता जगताप, अश्विनी भोसलकर, किरण शिंदे (सरचिटणीस), दत्तात्रय ढोरे, विनोद वाघुले, संकेत शिंदे, निलेश शेवकर, संतोष मराठे, भानुदास शिंदे, संतोष वंजारी, विनोद भागवत (मा. ग्रा. सदस्य), विनोद शिंदे, सतीश शेवकर, बालाजी ग्रुपचे सर्व सदस्य व सर्व सहभागी स्पर्धक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत यांनी आपल्या मनोगतात प्रशांत भागवत यांच्या नेतृत्वाचे कौतूक करून त्या आमदार सुनील शेळके यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमन करीत असल्याबद्दल सांगितले. तर इंदोरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे यांनी प्रशांत भागवत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे कौतूक करीत त्यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सारिका ताई सुनील शेळके यांनी प्रशांत भागवत यांनी महिला वर्गासाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतूक करीत तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. यासह आमदार सुनील आण्णांचा आशीर्वाद नेहमी सोबत राहिल असेही ( Prashant Bhagwat) सांगितले.
आभार प्रदर्शन करताना, प्रशांत दादा भागवत यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे ( Prashant Bhagwat)आणि महिला भगिनी, पुरुषांचे आभार मानले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहभागाबद्दल धन्यवाद दिले. तसेच, मावळचे जनसेवक आमदार सुनील शेळके यांना आपण पांडुरंग मानतो, त्यांच्या फक्त पायची वीट होण्याचे काम आपण करीत आहोत, हे सांगताना जनसेवेचा हा वारसा पुढे नेणार असल्याचे सांगितले.
प्रशांत दादा भागवत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून, त्यांच्या पुढाकाराने झालेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम ठरला. अखेर सुग्रास जेवणाने कार्यक्रमाची सांगता ( Prashant Bhagwat) झाली.