situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Srujan Nrutyalay : मंदिरे हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा _ आशुतोष बापट

Published On:
Srujan Nrutyalaya

सृजननृत्यालयाच्या वतीने अभ्यास पुर्ण व विचार प्रवर्तक व्याख्यानाचे आयोजन

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील सृजन नृत्यालयाच्या वतीने ( Srujan Nrutyalay) आयोजित करण्यात आलेल्या एका अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक व्याख्यानात “मंदिर कसे पहावे?” या विषयावर मार्गदर्शन करताना नामवंत अभ्यासक श्री आशुतोष बापट यांनी हे विचार व्यक्त केले. दक्षिणेतल्या मंदिरांच्या अभ्यासासाठी सृजन नृत्यालयाच्या आगामी शैक्षणिक सहलीच्या पार्श्वभूमीवर कलापिनी सांस्कृतिक केंद्रातील अवकाश रंगमंच इथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Breaking News : पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गॅंगवॉर ; नाना पेठेत गोळीबारात खून


कार्यक्रमाच्या सुरुवातीला सृजन नृत्यालयाच्या संचालिका डॉ. मीनल कुलकर्णी यांनी ( Srujan Nrutyalay) आपल्या प्रास्ताविकात, मंदिरे ही केवळ धार्मिक स्थळ नसून, नृत्यकलेचे सादरीकरण आणि परंपरेची वाहक आहेत असे सांगितले. तसेच शिल्पकला ही नृत्यकलेचा इतिहास सांगणारी आहे असे सांगून नृत्याच्या अभ्यासातील मंदिर व शिल्प यांचे महत्त्व सांगितले. जान्हवी सरोदे हिने वक्त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर शैक्षणिक सहलीचे प्रमुख मंदार थिटे यांनी श्री.आशुतोष बापट यांचे स्वागत केले.

Prashant Bhagwat : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत भागवत यांना मोठा सकारात्मक प्रतिसाद


आशुतोष बापट यांनी “मंदिर कसे पहावे?” यावर अतिशय माहितीपूर्ण व्याख्यान दिले. स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, मूर्तिकला आणि नृत्य यातील नाते त्यांनी आपल्या व्याख्यानातून उलगडले. त्यांनी शिल्पांमागचा विचार, सूचकता, शिल्पामधून प्रकट होणारे भाव, आणि रंगशिळांचा संदर्भ सांगितला.


मंदिरे हा भारतीय संस्कृतीचा एकमेव अमूल्य ठेवा आहे असे सांगून त्यांनी शिवालय, शैव संप्रदाय, शिलालेख, रंगशिळा, सुरसुंदरी कामशिल्प, ललाटबिंब ,कीर्ती मुख ( Srujan Nrutyalay) यासारख्या मंदिरातील शिल्पांच्या संकल्पना अतिशय सुरेख शब्दात उलगडून सांगितल्या . मंदिराची रचना त्यामागचा शास्त्रीय व अध्यात्मिक विचारही वेगवेगळ्या पौराणिक कथांचा संदर्भ देत रंजकतेने सांगितला. तसेच कोणार्क, बेलूर, हळेबीडू, तंजावूर यासारख्या मंदिरांच्या स्लाईड ( चित्रे) दाखवून त्यांचा इतिहास सांगितला.


बृहदेश्वर मंदिरातील ४०००० किलोचा दगडाची स्तुपी, कंदारिया महादेव मंदिराची रचना, आणि शांतला देवीचे नृत्य यासारख्या अनेक गोष्टींचा त्यांनी अभ्यासपूर्ण वेध ( Srujan Nrutyalay) घेतला. कार्यक्रमात आनंद तांडव, आक्रंद तांडव, वृषभ तांडव तसेच चतुष्पाद सदाशिव, चार प्रकारच्या मुक्ती व मंदिरे या संकल्पनांवरही त्यांनी प्रकाश टाकला.


या व्याख्यानातून त्यांनी उपस्थित रसिकांना भारतीय कला, संस्कृती व इतिहासाशी अधिक जवळीक निर्माण करून दिली. मंदिरे बघण्याची नवी दृष्टी दिली व्याख्यानासाठी सृजन च्या विद्यार्थिनी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. तसेच जिज्ञासू श्रोतेही आवर्जून व्याख्यानाला उपस्थित होते. व्याख्यानाचे संयोजन श्री दिनेश कुलकर्णी यांनी केले. नंदिनी ढबू यांनी आभार ( Srujan Nrutyalay) मानले.

Follow Us On