मावळ ऑनलाईन –श्रीसमर्थ सेवा समिती व श्रीयोगीराज सेवा ( Atharvashirsha Pathan)फाउंडेशन यांच्या वतीने गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५:०० वाजता योगीराज हॉल, तळेगाव दाभाडे येथे बालगोपालांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठण व बालगोपाल मेजवानी याचे आयोजन करण्यात आले आहे.
Dagdusheth Ganapati : दगडूशेठ’ गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती
गणपती अथर्वशीर्ष नित्य पठणानाने जीवनात सर्वांगीण प्रगती होते,सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, अभ्यासात प्रगती होऊ लागते, विचारांची नकारात्मकता दूर होऊन विचार शुद्ध आणि पवित्र होतात,उच्चारातील दोष जाऊन उच्चार शुद्ध होण्यास मदत होते,गणपतीची ( Atharvashirsha Pathan)कृपा जाणवू लागते,सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी यात सहभागी ,असे आयोजकांनी सांगितले.
Talegaon-Pune Local : तळेगाव- पुणे दुपारच्या लोकल सेवेसाठी बाप्पाकडं साकडं!
सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी पर्यंत आपण पूर्व नोंदणी करू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क ( Atharvashirsha Pathan)
श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन
CIN : U85300PN2020NPL194304
डी.पी. रोड राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ जिल्हा पुणे – ४१०५०६.
मो. ९३७१०१६०३२ / ९०११९२४८५३