चांदीच्या फ्रेम, चांदीची नाणी किंवा नारायणी पैठणी साडया जिंकण्याची संधी, बुधवारपासून स्पर्धेची सुरुवात
मावळ ऑनलाईन –लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी (Majha Bappa Gharoghari)आपण सर्वांनीच आपल्या घरी कल्पकतेने सुंदर, वैविध्यपूर्ण आरास केली आहे. आपल्यातील याच सर्जनशीलतेला व्यासपीठ देण्यासाठी शहरातील लोकप्रिय mavalonline.com या न्यूज चॅनलच्या वतीने ‘माझा बाप्पा घरोघरी’ ही ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली आहे. चला तर मग, उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होऊन छान-छान बक्षिसे मिळवा.
‘माझा बाप्पा घरोघरी’ ही स्पर्धा ऑनलाईन असणार आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत स्पर्धेत सहभागी होता येईल. यामध्ये आपण आपल्या घरच्या गणरायासाठी केलेली सुंदर आरास व बाप्पांच्या लोभस मूर्तींची छायाचित्रे अथवा व्हिडिओ आम्हाला पाठवायचे आहेत.
सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व एक हमखास बक्षीस मिळणार आहे आणि विजेत्यांना सुंदर-आकर्षक भेटवस्तू बक्षीस मिळणार आहे.
नामांकित दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. त्यांच्याकडून ५१ विजेत्यांना चांदीच्या आकर्षक फ्रेम बक्षीस मिळणार आहेत. दीपचंद मिल्स आणि भांबुर्डेकर सराफ आणि ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत. दीपचंद मिल्सकडून २१ विजेत्यांना नारायणी पैठणी साडी आणि भांबुर्डेकर ज्वेलर्सकडून २१ विजेत्यांना चांदीचे नाणे बक्षीस दिले जाईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या घरच्या मनोहारी सजावटीत विराजमान झालेल्या बाप्पांचे छायाचित्र सोबत दिलेली लिंक ओपन करुन तिथे अपलोड करायचे आहे. आपण पाठवलेले छायाचित्राची फाईल साईज १० MB पेक्षा जास्त नसावी.
सोबत आपले पूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहायला विसरायचे नाही. प्राप्त छायाचित्रांचे मान्यवरांकडून परीक्षण करुन अंतिम निकाल घोषित केला जाईल. मिळणाऱ्या प्रतिसादानुसार बक्षिसांची संख्या वाढवणे किंवा कमी करणे आणि याबाबतचे सर्व अधिकार संयोजकांकडे राहतील. छायाचित्र अपलोड करण्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे.
Lonavala: लोणावळ्यात यंदा पावसाचा 200 इंचांचा टप्पा पार
PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएल बस मार्गांमध्ये बदल
मग चला, लागा तयारीला. या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कला सर्वांसमोर (Majha Bappa Gharoghari)सादर करा. तुमची कला पाहून इतरांनाही कला जोपासण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि कलाधिपती बाप्पांचा आशिर्वाद तुम्हाला लाभेल. गणपती बाप्पा मोरया.
इथे अपलोड करा फोटो…
लिंक -https://forms.gle/oJWJ6Vi5tgSKzKNF9
स्पर्धेच नियम व अटी असे –
१) स्पर्धकाने स्वतःच्या घरच्या गणपतीचाच फोटो पाठवायचा आहे.
२) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
३) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या बाप्पांचा फोटो संबंधित न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. या खेरीज प्रत्येकाला प्रमाणपत्र व एक हमखास बक्षीस.
४) १०१ विजेत्यांना चांदीची आकर्षक फ्रेम, नारायणी पैठणी साडी किंवा चांदीचे नाणे यापैकी एक बक्षीस देण्यात येईल.
५) स्पर्धकांच्या प्रतिसादानुसार बक्षिसांची संख्या वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार संयोजकांकडे राहील.
६) विजेत्या स्पर्धकांना कळविण्यात येईल त्या ठिकाणाहून व दिलेल्या मुदतीत जाऊन बक्षीस स्विकारावे लागेल.