मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – १. (११.५० नंतर द्वितिया). शके १९४७. वार – रविवार. तारीख – २४.०८.२०२५. (Rashi Bhavishya 24 August 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – संध्याकाळी ४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी. चंद्र राशी – सिंह.
मेष- (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 24 August 2025
आज तुम्ही आनंदी व सकारात्मक असाल. रुटीन कामातून थोडा मौजमजे साठी वेळ काढाल. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊन मुलांचेही हट्ट पुरवाल.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
घर बांधकामाशी संबंधित असलेले व्यवसाय उत्तम चालतील. नवीन वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल. प्रेमी युगोलांनी आजच्या दिवस मौन पाळावे.
मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
आज तुमच्या वागण्यात आक्रमकता असेल. अति उत्साहात तुम्ही घेतलेले निर्णय चुकू शकतील. रागावर नियंत्रण व वाणीत गोडवा ठेवणे गरजेचे आहे.
कर्क ( शुभ रंग- राखाडी)
व्यापारी वर्गाला पैसा कमावण्याचे विविध मार्ग सुचतील. आज व्यवसायात मर्यादित रिस्क घ्यायला हरकत नाही. शक्यतो आज प्रवास टाळावा.
Pune-Lonavala Local : पुणे-लोणावळा रेल्वे मार्गिकेवर तिसरी-चौथी लाइन ; लोकल प्रवाशांना मोठा दिलासा
सिंह ( शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 24 August 2025
मनाच्या लहरीपणाला आवर घालणे गरजेचे आहे. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागावे.
कन्या (शुभ रंग- मोरपंखी)
आज अनावश्यक खर्चावर ताबा असणे गरजेचे आहे. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. आज संततीच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
तूळ (शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस आहे. चंद्र राशीच्या लाभात असताना उद्योग व्यवसायात यश दृष्टिक्षेपात येईल. संततीचे विवाह योग जुळतील.
वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)
आज चालून आलेल्या उत्तम संधींचा फायदा घ्या. कामाचे तास वाढवा. काही योग्य माणसे आज संपर्कात येतील. नकारात्मक लोकांशी संगत टाळावी.
Ganeshotsav: गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा मिळाल्याने पुण्यात तयारीला वेग
धनु (शुभ रंग- मरून) Rashi Bhavishya 24 August 2025
व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असताना मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका. आपल्या मर्यादेत रहा. गैरव्यवहार अंगाशी येऊ शकतात. आज सज्जनांचीच संगत धरा.
मकर (शुभ रंग- सोनेरी)
महत्त्वाच्या चर्चा व व्यावसायिक करार उद्यावरच ढकला. मोठे आर्थिक व्यवहार आज नकोत. वैवाहिक जीवनात थोडेफार वैचारिक मतभेद राहतील, पण फार ताणू नका.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
व्यावसायिक भागीदारीत गैरसमज असतील तर सुसंवादाने मिटतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी गोडी गुलाबी राहील. कार्यक्षेत्रा नवी आव्हाने पेलू शकाल.
मीन ( शुभ रंग – मोतिया)
आजारी व्यक्तींनी पथ्य पाणी पाळावे. एखादा बरा झालेला आजार परत उलटण्याची शक्यता आहे. रखडलेली येणे आज मागितली तर वसूल होऊ शकतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424
