मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – १४, शके १९४७. वार – शुक्रवार. तारीख – २२.०८.२०२५. (Rashi Bhavishya 22 August 2025)
शुभाशुभ विचार – चतुर्दशी वर्ज्य.
आज विशेष – दर्श पिठोरी अमावस्या.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – आश्लेषा. चंद्र राशी – कर्क.
मेष- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 22 August 2025
बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालावे लागणार आहे. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद असेल. गृहिणी अतिवस्त असतील.
वृषभ (शुभ रंग- पांढरा)
कार्यालयीन कामासाठी जवळपास चे प्रवास होतील. भावंडात सलोखा राहील. विविध मार्गाने आलेला पैसा खर्च करण्याचे विविध मार्ग सुचतील. थोडी दगदग होईल.
मिथुन (शुभ रंग – डाळिंबी)
आज दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. सर्व कामे वेळे आधी पार पडतील. संध्याकाळी काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. तुमचा कार्य उत्साह वाढेल.
कर्क ( शुभ रंग- मरून)
आज सगळी महत्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. वैवाहिक जीवनात संध्याकाळी भंड्याला भांडे लागू शकते. सत्संगाकडे पावले वळवा.
सिंह ( शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 22 August 2025
काही जणांना अनपेक्षित घडणारे प्रवास कार्य साधक ठरणार आहेत. विदेशाशी संबोधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. आज मृगजळा मागे धावू नका.
कन्या (शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रात पूर्वी केलेले कष्ट कारणी लागतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. आज दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.
तूळ (शुभ रंग- हिरवा)
आज केवळ चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात चालून आलेल्या संधी सकारात्मकतेने स्वीकाराल. नोकरदारांना अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
आज काही मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी जुन्या चुका निस्तराव्या लागतील. शासकीय नियम काटेकोरपणे पाळणे हिताचे राहील.
धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 22 August 2025
कामगार वर्गाने आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. तरुणांनी प्रलोभनांच्या आहारी जाऊ नये. आज गैरवर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकते, सांभाळा.
मकर (शुभ रंग- निळा)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या बोलण्याचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.
कुंभ ( शुभ रंग- लाल)
ज्येष्ठांनी पथ्य पाणी पाळावे. एखादा बरा झालेला आजारही पुन्हा डोके वर काढू शकतो. येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. मामा मावशीकडून सुवार्ता येतील.
मीन ( शुभ रंग – आकाशी)
उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. कलाकारांनी आज आलेली कोणतीच संधी सोडू नये. खेळाडूंचा आज प्रतिस्पर्ध्यावर विजय नक्की होईल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424